Shubman Gill and Sanju Samson’s Win Today Match?; 3 incidents before the match increased the tension of Hardik Pandya and KL Rahul

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

RR Vs LSG: MI Vs GT: आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज दोन सामने खेळवले जाणार आहे. यामधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना राजस्थानमधील जयपुरच्या मैदानात खेळवला जाणार आहे. दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर मुंबई आणि गुजरात लढत रंगणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.

तुम्ही मुंबई किंवा लखनौ संघाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी बातमी चांगली नाही. मुंबई आणि लखनौ आज संघांनाही निराशेचा सामना करावा लागू शकतो. मुंबई आणि लखनौला आज पराभवाचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स हे संघ विजयासह आपले खाते उघडताना दिसतील. आता तुम्ही विचाराल असे कसे? सामन्यापूर्वी घडलेल्या त्या 3 घटना कोणत्या होत्या, ज्यामुळे गिल आणि सॅमसनच्या संघांचा विजय निश्चित वाटत होता. तर पुढील तीन घटना IPL 2024 च्या पहिल्या 3 सामन्यांशी संबंधित आहेत.

शुभमन गिल आणि संजू सॅमसनचा विजय का निश्चित?

1. खरं तर, या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यांमध्ये यजमान राहिलेल्या संघाने विजय मिळवला आहे. म्हणजे पाहुण्या संघावर यजमानांचा वरचष्मा राहिला आहे. आता सुपर संडेच्या सामन्यांमध्येही हाच ट्रेंड कायम राहिला तर कर्णधार म्हणून शुभमन गिलचा आयपीएल्या इतिहासातील पहिला विजय निश्चित आहे. त्याआधी संजू सॅमसनचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावरही विजयी होताना दिसतो.

2. IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात CSK ने RCB चा पराभव केला. हा सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर खेळला. यानंतर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. पंजाबचे नवे होम ग्राउंड मुल्लानपूर येथे बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये हा सामना खेळला गेला. तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर पराभव करून जिंकला.

3. आयपीएल 2024 च्या पहिल्या सुपर संडेच्या पहिल्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्यांच्या होम ग्राउंड जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळायचे आहे. दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे, जे गुजरात टायटन्सचे होम ग्राउंड असेल. येथे त्याला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे. साहजिकच गेल्या 3 सामन्यांप्रमाणेच हा ट्रेंड कायम राहिला तर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि लखनौचा कर्णधार केएल राहुलच्या अडचणी नक्कीच वाढतील.

संबंधित बातम्या:

RR vs LSG सामन्यात कर्णधार अन् उपकर्धार कोणाला बनवाल?; 11 खेळाडू तुम्हाला करतील मालामाल

IPL 2024 Points Table: पंजाब किंग्सची मोठी झेप; दिल्ली-हैदराबादची स्थिती खराब, पाहा आयीपएलचे Latest Points Table

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts