ipl 2024 gujarat titans may gave chance to umesh yadav in playing 11 against mumbai indians

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वातील पाचवी मॅच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात होणार आहे.पाचवेळा विजेतेपद पटकावणारी मुंबई आणि एकवेळा विजेतेपद मिळवणारी गुजरात यांच्यात लढत होणार आहे.मुंबई आणि गुजरात यांच्यातील पहिली लढत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे. मुंबईचं हार्दिक पांड्या करेल तर गुजरातचं नेतृत्त्व शुभमन गिल करणार आहे. 

विशेष बाब म्हणजे दोन्ही टीम नव्या कॅप्टनसह रिंगणात उतरणार आहेत. मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व आता रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्या करणार आहे.तर, हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सच्या संघातून मुंबईकडे गेल्यानं शुभमन गिलवर नेतृत्त्व करण्याची जबाबदारी आहे. गुजरात टायटन्सनं 2022 च्या स्पर्धेत विजेतेपद मिळवलं होतं. 2023 च्या आयपीएलमध्ये उपविजेतेपद गुजरातला मिळालं होतं. शुभमन गिलच्या तुलनेत हार्दिक पांड्यावर या मॅचमध्ये अधिक दबाव असणार आहे.मुंबईचे चाहते जी अपेक्षा रोहित शर्माच्या कामगिरीबाबत ठेवयाचे तशाच अपेक्षा हार्दिक पांड्याबाबत असतील.

मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादव

हार्दिक पांड्यानं गुजरातचा संघ सोडून मुंबईचं नेतृत्त्व स्वीकारलं आहे. याशिवाय गुजरातला दुसरा धक्का बसला आहे तो म्हणजे त्यांचा आक्रमक गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळं संघाबाहेर असल्यानं गुजरातला त्याची जागा भरुन काढणं आव्हान असणार आहे. मोहम्मद शमीच्या जागी मराठमोळ्या उमेश यादवला (Umesh Yadav) संधी मिळू शकते. उमेश यादव हा मोहम्मद शमीच्या कामगिरीची बरोबरी करु शकला नाही तरी बॉल नवीन असताना तो स्विंग करु शकतो. 

सूर्यकुमार यादव संघाबाहेर

मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. येत्या काही दिवसात त्याची नॅशनल क्रिकेट अकादमी बंगळुरु येथे पुन्हा चाचणी  होणार आहे. त्यामध्ये तो फिट ठरल्यास मुंबईच्या टीममध्ये कमबॅक करु शकतो. 

हार्दिक पांड्या कोणत्या स्थानावर बॅटिंग करणार?

मुंबई इंडियन्सचा संघ तब्बल 10 वर्षानंतर नव्या कॅप्टनसह स्पर्धेला सामोरं जाणार आहे. रोहित शर्माऐवजी यावेळी कॅप्टन्सी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळं हार्दिक पांड्यावर कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करण्याचं दडपण असणार आहे. याशिवाय हार्दिक पांड्या कोणत्या स्थानावर बॅटिंगला येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.    

दोन्ही संघांसमोर विजयानं सुरुवात करण्याचं आव्हान

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या कॅप्टनपदाची जबाबदारी असणाऱ्या हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलपुढं यंदाच्या आयपीएलचं अभियान विजयानं सुरु करण्याचं आव्हानं असेल. यासाठी दोन्ही संघ सर्व ताकदीसह मैदानात उतरतील. 

संबंधित बातम्या :

राजस्थानची प्रथम फलंदाजी, लखनौच्या संघात एकापेक्षा एक धुरंधर, पाहा प्लेईंग 11

Rishabh Pant: ऋषभ पंतने कुलदीप यादवला दिली हिंट; पुढच्या चेंडूवर फलंदाज बाद, नेमकं काय घडलं?, Video

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts