rr vs lsg sanju samson continue better performance in first match of ipl last four edition

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) यांच्यात आयपीएलमधील चौथी मॅच  सुरु आहे. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन यानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. जोस बटलर 11 धावा करुन बाद झाला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या संजू सॅमसननं 82 धावांची खेळी करत राजस्थानला 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 193 धावांपर्यंत पोहोचवलं. राजस्थान रॉयल्सनं लखनौ सुपर जाएंटस पुढं 194 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 

संजू सॅमसननं डाव सावरला

राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन म्हणून संजू सॅमसनची कामगिरी चांगली राहिली आहे. संजू सॅमसननं आजच्या 82 धावांच्या खेळीमध्ये 6 सिक्स मारले आहेत. याशिवाय त्यानं 3 चौकार देखील मारले. संजू सॅमसन यानं एक बाजू लावून धरत केलेल्या राजस्थाननं 4 बाद 193 धावा केल्या. 

राजस्थानच्या पहिल्या मॅचमध्ये संजू सॅमसनची वादळी खेळी

संजू सॅमसननं 2020 ते 2024 च्या आयपीएलपर्यंत राजस्थानच्या पहिल्या मॅचमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये पहिल्या मॅचमध्ये संजू सॅमसननं 74 धावा केल्या होत्या.  2021 च्या आयपीएलमध्ये त्यानं 119 केल्या होत्या. संजू सॅमसननं 2022 आणि 2023 च्या आयपीएलमध्ये 55 धावा केल्या होत्या. आजच्या लखनौ विरुद्धच्या मॅचमध्ये संजू सॅमसननं 82 धावा केल्या आहेत. 

संजू सॅमसनचं आयपीएल करिअर

संजू सॅमसननं आयपीएलमध्ये 153 मॅचेस खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 3970 धावा केल्या आहेत. संजूची धावा करण्याची सरासरी 29.85 असून त्यानं 137.56 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत. संजूच्या नावावर आयपीएलमध्ये 3 शतकांची नोद आहे. संजूनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 21 अर्धशतकं केली आहेत. आयपीएलमध्ये संजूची सर्वाधिक धावसंख्या 119 इतकी आहे. 

राजस्थान विजयानं अभियान सुरु करणार?

राजस्थान रॉयल्सनं आयपीएलच्या पहिल्या पर्वात विजेतेपद पटकावलं होतं.2008 नंतर  राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विजेतेपद मिळवण्याच्या  इराद्यानं मैदानात उतरलं आहे. राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात पुन्हा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणार का हे पाहावं लागणार आहे.

लखनौला सुरुवातीला धक्के

राजस्थाननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 बाद 193 धावा केल्या आहेत. या मॅचमध्ये विजयासाठी लखनौला 194 धावा कराव्या लागणार आहेत.  या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली आहे. लखनौच्या टॉप ऑर्डरचे  फलंदाज  क्विंटन डी कॉक, पडिक्कल आणि आयुष बदोनी मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. लखनौनं 11 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. लखनौ मॅचमध्ये कमबॅक करणार का हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Mitchell Starc: 24.75 कोटीच्या स्टार्कची SRH ने काढली लाज, 6 चेंडूत चोपल्या 26 धावा

MI vs GT : मुंबई इंडियन्सकडून धमाकेदार व्हिडीओ शेअर, मग होऊ दे राडा म्हणत गुजरात टायटन्सला दिला इशारा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts