ipl 2024 rr vs lsg trent boult taken wicket of devdutta padikkal after bouncer attack on helmet

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर : आयपीएलच्या 17 व्या (Indian Premier League) हंगामातील चौथ्या मॅचमध्ये  राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants)  यांच्यात मॅच सुरु आहे. राजस्थाननं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 193 धावा केल्या होत्या. राजस्थाननं दिलेल्या 193 धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपरजाएंटसची सुरुवात समाधानकारक झाली आहे. राजस्थानचा आक्रमक बॉलर ट्रेंट बोल्टनं सुरुवातीच्या ओव्हरमध्ये लखनौला धक्के दिले. ट्रेंट बोल्टची ओळख आयपीएलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेणारा बॉलर अशी आहे. आजच्या मॅचमध्ये देखील राजस्थान रॉयल्सकडून त्यानं अशीच कामगिरी करुन दाखवली. 

ट्रेंट बोल्टनं ती परंपरा जपली 

ट्रेंट बोल्टनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 2020 ते 2023 या दरम्यानच्या स्पर्धांमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 21 फलंदाजांना बाद केलं होतं. आजच्या मॅचमध्ये देखील ट्रेंट बोल्टनं ती परंपरा कायम ठेवली ट्रेंट बोल्टनं पहिल्याच ओव्हरमध्ये क्विंटन डीकॉकला 4 धावांवर बाद केलं. 

क्विंटन डीकॉक बाद झाल्यानंतर लखनौचा देवदत्त पडिक्कल मैदानात बॅटिंगला आहे. डावाच्या तिसऱ्या आणि ट्रेंट बोल्टच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये देवदत्त पडिक्कल बॅटिंग करत होता. यावेळी ट्रेंट बोल्टनं टाकलेला बॉऊन्सर थेट पडिक्कलच्या हेल्मेटवर आदळला.या बाऊन्सरमुळं  पडिक्कलच्या हेल्मेटच्या मागील बाजूच्या प्रोटेक्शन क्लीप तुटून ग्राऊंडवर पडल्या.ट्रेंट बोल्टच्या बाऊन्सरमुळं देवदत्त पडिक्कल बॅकफूटवर गेला. बोल्टनं टाकलेला दुसरा बॉल पडिक्कलकडून मिस झाला आणि तो स्टम्पवर गेला.  ट्रेंट बोल्टनं यानंतर आणखी एका ओव्हरमध्ये टाकलेला बाऊन्सर के.एल. राहुलच्या हेल्मेटवर आदळला. बोल्टनं आजच्या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये  35 धावा देत २ विकेट घेतल्या. 

ट्रेंट बोल्टचं आयपीएल करिअर

ट्रेंट बोल्टनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 89 मॅचेस खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 2822 धावा देत 107 विकेट घेतल्या आहेत.बोल्टनं 18 धावांमध्ये 4 विकेट घेतल्या ही त्याची सर्वात चांगली कामगिरी आहे. ट्रेंट बोल्टनं 2020 च्या आयपीएलमध्ये 25 विकेट घेतल्या होत्या. 

राजस्थानची विजयी सुरुवात 

राजस्थान रॉयल्सनं 17 व्या आयपीएलची विजयानं सुरुवात केली आहे.राजस्थाननं लखनौ सुपर जाएंटसचा 20 धावांनी पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन याच्या 82 धावांमुळं राजस्थाननं 4 विकेटवर 193 धावा केल्या होत्या. राजस्थानच्या 193 धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जाएंटसला 6 विकेटवर 173 धावा करता आल्या. लखनौचा कॅप्टन केएल. राहुल यानं 58 धावा केल्या. निकोलस पूरन यानं देखील 64 धावा केल्या मात्र, या दोघांची अर्धशतकं देखील व्यर्थ गेली.  राजस्थान रॉयल्सला आजच्या सामन्यात विजय मिळाला असून त्यांचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स विरोधात 28 मार्चला होणार आहे.   

संंबंधित बातम्या : 

IPL 2024 : हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IPL 2024 RR vs LSG : राहुल-पूरनची अर्धशतकं व्यर्थ, राजस्थानकडून लखनौचा 20 धावांनी पराभव

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts