ipl 2024 gt vs mi live score updates gujarat titans vs mumbai indians scorecard match highlights narendra modi stadium ahmedabad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 GT vs MI LIVE Score Updates: जसप्रीत बुमराहच्या (jasprit Bumrah) भेदक माऱ्यापुढे गुजरातच्या (GT) फलंदाजांनी लोटांगण घातलं. बूम बूम बुमराहनं गुजरातच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. अहमदाबादच्या मैदानात गुजरातच्या संघाने 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 168 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून साई सुदर्शन यानं सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. बुमराह आणि गेराल्ड कोइत्जे यांनी गुजरातच्या (Gujarat Titans vs Mumbai) फलंदाजांना रोखलं. 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. गुजरातच्या फलंदाजांना ठरावीक अंतरानं तंबूत पाठवलं. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी गुजरातला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनी वेगानं धावा काढल्या, पण ठरावीक अंतराने दोघांनीही विकेट फेकल्या. वृद्धीमान साहा 19 धावा काढून बाद झाला. साहने चार चौकारांच्या मदतीने 15 चेंडूत 19 धावा चोपल्या. तर शुभमन गिल 22 चेंडूत 31 धावा काढून बाद झाला. यामध्ये त्यानं एक षटकार आणि तीन चौकार लगावले. 

साई सुदर्शनची एकाकी झुंज – 

सलामी फलंदाज माघारी परतल्यानंतर साई सुदर्शन यानं चार्ज घेतला.  ओमरजई याच्या साथीने साई सुदर्शन यानं धावसंख्या हालती ठेवली. पण ओमरजई यानेही विकेट फेकली. तो 11 चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. त्याने यामद्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला.  डेविड मिलरही  फार काळ मैदानावर स्थिरावला नाही. त्याा बुमराहने पांड्याकरवी झेलबाद केले. डेविड मिलर 11 चेंडूत फक्त 12 धावा काढून बाद झाला. एकाबाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला साई सुदर्शन याने धावसंख्या हालती ठेवली होती. पण अखेरीस तोही 45 धावांवर बाद झाला. त्यानं 39 चेंडूमध्ये एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 45 धावांवर बाद झाला. विजय शंकर स्वस्तात तंबूत परतला. राहुल तेवातियाने आक्रमक फलंदाजी करत अखेरीस धावसंख्या वाढवली. तेवातियाने एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 22 धावांचं योगदान दिलं. णोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. राशिद खान 4 धावांवर नाबाद राहिला, तर विजय शंकर 6 धावांवर नाबाद राहिला. 

बूमराहचा भेदक मारा – 

मुंबईकडून जसप्रीत बुमराहने भेदक मारा केला. बुमराहच्या माऱ्यापुढे गुजरातचे फलंदाज ढेर झाले. जसप्रीत बुमराहने चार षटकात फक्त 14 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्याशिवा गेराल्ड कोएत्जे यानं दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानं चार षटकात 27 धावा दिल्या. पियुष चावला यानं एक विकेट घेतली. हार्दिक पांड्या, लूक वूड, सॅम्स मुलानी, नमन धीर यांना एकही विकेट मिळाली नाही.  

मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?

रोहित शर्मा, ईशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेविड, सॅम्स मुलानी, गेराल्ड कोइत्जे, पियूष चावला, लूक वूड

राखीव खेळाडू – डेवॉल्ड ब्रेविस, आर. शेफर्ड, विष्णू विनोद, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी

गुजरातच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू ?

वृद्धीमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवातिया, अजमतुल्ह ओमरजई, राशीद खान, उमेश यादव, साई किशोर, स्पेन्सर जॉनसन

राखीव खेळाडू – बीआर शरथ, मोहित शर्मा, मानव सुतार, अभिनव मनोहर, नूर अहमद

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts