India’s Tour Of England Announced, 5 Test Matches Series Will Be Played In WTC ; भारताचा इंग्लंडचा दौरा जाहीर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारताला इंग्लंडमध्ये आता WTC Final मध्ये मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण आता भारताचा इंग्लंड दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात आता पाच कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत.इंग्लंडचा दौरा हा भारतासाठी महत्वातता असतो. यापूर्वी भारताला संघ २०२१ साली करोनानंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. पण चार कसोटी सामन्यांची मालिकाच खेळवण्यात आली होती. कारण पाचव्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रथम करोना झाला होता आणि त्याचा प्रसार भारतीय संघातील सदस्यांना झाला होता. त्यामुळे हा कसोटी सामना त्यांना स्थगित करावा लागला होता. पण त्यापूर्वी झालेल्या चार सामन्यांत भारताने बाजी मारली होती.

गेल्या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना हा अनिर्णित राहीला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बाजी मारली होती आणि हा सामना त्यांनी तब्बल १५१ धावांनी जिंकला होता. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. कारण या सामन्यात इंग्लंडने भारताला तब्बल एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत केले होते. पण भारताने या पराभवाचा बदला हा चौथ्या कसोटीत घेतला होता. भारताने चौथा कसोटी सामना हा १५७ धावांनी जिंकला होता आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पाचव्या सामन्यात नेमकं काय घडतं, याची उत्सुकता सर्वांना होती. पण पाचवा सामना हा भारतीय संघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे होऊ शकला नव्हता.

आता भारतीय संघ पुन्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि पाच कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील पाच कसोटी सामने हे लॉर्ड्स, दी ओव्हल, एजबस्टन, हेडिंग्ले आणि ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानात होणार आहेत. भारतीय संघ २०२५ साली जून महिन्यात इंग्लंडल्या दौऱ्यावर जाणार आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील हे पाच सामने भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांसाठी महत्वाचे असतील.

[ad_2]

Related posts