[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rohit Sharma, Mumbai Indians, Holi 2024 : देशभरात आज होळीच्या सणाची धूम सुरु आहे. लहान-थोरांपासून सर्वजण धुळवडीच्या रंगात नाहून निघाले आहेत. यामध्ये भारतीय खेळाडूही मागे नाहीत. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स आणि कुटुंबासोबत होळीचा आनंद घेतला. रोहित शर्माने मौजमस्ती करत होळीचा आनंद द्विगुणित केला. रोहित शर्माच्या धुळवडीचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे, पण तो 10-15 वर्षांच्या मुलाप्रमाणे होळी खेळलाय. रंगाच्या पाण्यात लोळला, गडागडा लोळलाही.. डान्स केला.. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रोहित शर्माच्या चाहत्याला हा व्हिडीओ आवडला आहे. या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.
पाहा व्हिडीओ
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील जोरदार धुळवड साजरी केली आहे. रोहित शर्माने धुळवड साजरी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये रोहित रंगामध्ये माखलेला दिसत आहे. त्याचबरोबर तो इतरांवर पाणी उडवतानाही दिसत आहे.
Rohit Sharma celebrating Holi with his daughter….!!!! pic.twitter.com/hskV4sfMSs
— Johns. (@CricCrazyJohns) March 25, 2024
कुटुंबासोबत घेतला धुळवडीचा आनंद
37 वर्षीय रोहित शर्माने शानदार पद्धतीने धुळवडीचा आनंद घेतला. पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत रोहित शर्मा मनसोक्त रंगाची उधळण केली. त्याशिवाय रोहित शर्माने मुंबईच्या खेळाडूसोबतही रंगाची उधळण केली. रोहित शर्माने मोटर लावून सर्वांच्या अंगावर पाणी मारले. रोहित शर्माच्या धुळवडीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Happy Holi, everyone! 😍🎨
Brb, admin needs to get the phone repaired 🥲#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @ImRo45 pic.twitter.com/4I0aIqnvru
— Mumbai Indians (@mipaltan) March 25, 2024
आज, देशभरात होळीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. सर्वजण रंगाची उधळण करत आहेत. सर्वजण गाण्याच्या तालावर आणि रंगात नाऊन निघाले आहेत. खेळाडूही यामध्ये मागे राहिले नाहीत. मुंबई, कोलकाता, पंजाब, दिल्ली, आरसीबी सर्वच संघातील खेळाडूंनी होळीच्या सणाचा आनंद घेतला. मुंबई इंडियन्साचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही रंगाची उधळण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Boult celebrating Holi. 👌pic.twitter.com/6RJADgCW9q
— Johns. (@CricCrazyJohns) March 25, 2024
अधिक पाहा..
[ad_2]