Arshdeep Singh’s Ball Became Viral In Social Media ; अर्शदीपचा चेंडू होता की आगीचा गोळा…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : एकिकडे भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव केला, पण दुसरीकडे त्याच इंग्लंडमध्ये अर्शदीप सिंगने आता कहर केला आहे. कारण इंग्लंडमध्ये खेळत असताना अर्शदीपका एक चेंडू कोणालाच समजला नाही आणि बॅट्समन क्लीन बोल्ड झाल्यावर चेंडूचा वेग समजता आला. अर्शदीपच्या या चेंडूचा व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.इंग्लंडच्या मातीत भारताचा पराभव झाला, त्याच इंग्लंडच्या मातीत भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा नेत्रदीपक कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. अर्शदीप सिंग हा सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे. यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे ज्या संघाकडून खेळायचे त्या केंट या संघाकडून सध्या अर्शदीप खेळताना दिसत आहे. या संघाकडून खेळत असताना अर्शदीपचा एक व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.या सामन्यात सरे संघाला जेमी स्मिथ हा दमदार फलंदाजी करत होता. स्मिथने ७७ चेंडूंत तब्बल १८ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ११४ धावा केल्या होत्या. त्यामुळे स्मिथ हा केंट संघाच्या विजयाच्या मार्गात मोठा अडसर बनू पाहत होता. त्यामुळे आता स्मिथला कसे बाद करायचे, हा प्रश्न केंटच्या कर्णधारापुढे पडला होता. केंटच्या कर्णधाराने यावेळी अर्शदीपवर विश्वास टाकला आणि त्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. कारण अर्शदीपने यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. त्याचबरोबर अर्शदीपच्या चेंडूमध्ये चांगलाच वेग होता. त्यामुळे स्मिथला अर्शदीपचा हा चेंंडू समजला नाही. स्मिथ हा जोरदार फटकेबाजी करत होता, तशीच फटकेबाजी तो अर्शदीपच्या या चेंडूवरबी करायला गेला. पण अर्शदीपच्या चेंडूचा वेग एवढा होता की स्मिथला त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे या चेंडूचा सामना करताना तो चुकला आणि क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले. अर्शदीपच्या या चेंडीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली


भारतीय संघ जेव्हा विश्व अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळत होता, तेव्हा अर्शदीप इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळाले होते.

[ad_2]

Related posts