Zero Hour Full Episode Mahayuti And MVA Controversy On Lok Sabha Baramati Election Vijay Shivtare NCP Maharashtra News sarita kaushik ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zero Hour Full Episode : महायुती, मविआत जागा अन् उमेदवारांचा वाद, बारामतीवरून शिवतारेंचा एल्गार कायम
आज अनेक मतदार संघात राजकीय धुळवड बघायला मिळाली.  महाराष्ट्रातही लोक सभेचे रंग पाहायला मिळले.. महायुती असो की महाविकास आघाडी.. कुठे प्रेमाचे रंग .. तर कुठे संघर्षाचे .. उदाहरणार्थ.. जिथं देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महायुतीतील वादांवर तोडगा काढला जातोय.. नेत्यांमध्ये समेट घडवली जातेय… तिथं अमरावतीमध्ये राणा विरुद्ध कडू.. अशी संघर्षाची होळी पेटलीय.. अशाच घडामोडी महाविकास आघाडीमध्येही आहेत.. जिथं मातोश्रीवर खुद्द शरद पवार पोहचले … ह्या घडीला चर्चा हि जागावाटपाचीच …शेवटी अजूनही अनौपचारिक उमेदवार क्ती हि असले, तरी औपचारिक घोषणा दोन्ही पक्षांनी केलेली नाही. तर काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील नावांमुळे उडालेला धुरळा हा कायम असून बारामतीच्या जागेवरुन विजय शिवतारेंनी नवे रंग चढवलेत..
नको नको त्या शिव्या रस्त्यावर शिमग्याला ऐकू येतात … राजकीय धुळवडीत सुद्धा औकात.. स्वार्थी.. झुंडशाही.. घराणेशाही.. राक्षस.. ब्रह्मराक्षस.. विंचू… चप्पल.. पाशवी शक्ती.. दहशतवाद.. अशे अनेक विशेषणं आपल्या विरोधकांसाठी ऐकायला मिळाली. हा शब्दांचा प्रवास होता विजय शिवतारेंचा … आणि तो हि अजित पवार आणि शरद पवार अशा दोघांच्या विरोधात. आता मात्र विजय शिवतारेंची बारामती लोकसभा लढण्याची भूमिका ही, ‘जनतेची लढाई ही देवाची लढाई’ ह्या वाक्यापर्यंत पर्यंत पोहोचलीय.. कुणालाच ‘अंडरएस्टिमेट’ करु नये, म्हणत १२ एप्रिलला शिवतारे उमेदवारीला अर्ज भरणार असल्याचे सांगून गेलेत. २०१९मधील अजित पवारांचं वक्तव्य वर्मी बसलेल्या विजय शिवतारेंनी, सर्व हिशोब मांडत .. पवारांना घाम फोडलाय… थेट नेताच टार्गेट होत असल्यामुळे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झालीय .. शिंदेंनी शिवतारेंना समज द्यावी.. मानसिक संतुलन बिघडलंय.. शिवतारेंच्या आरोपांमागचा मेंदू दुसरा.. असं प्रत्युत्तर देणाऱ्या राष्ट्रवादीने, शिवतारेंच्या आरोपांचं पाणी नाकातोंडात जाऊ लागल्यानंतर, आता तर थेट महायुतीतून बाहेर पडण्याचाच इशारा दिलाय..

[ad_2]

Related posts