Thane Police Investigated The Case Of Murder Of Woman Wrapped In Cellotape Mumbra Thane Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Thane Crime: ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे प्लास्टिक गोणीत सापडलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा अखेर झाला असून महिलेच्या पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मुंब्रा पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

मुंब्रा रेतीबंदर खाडीलगत 27 मे 2023 रोजी एका प्लॅस्टिकच्या गोणीत सेलोटेपच्या सहाय्याने बेडशीटमध्ये गुंडाळालेले अत्यंत सडलेल्या अवस्थेत महिलेचे शव मिळाले होते आणि या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करत अत्यंत क्लिष्ट अशा या खुनाचा उलगडा केला आहे.

मुंब्रा पोलिसांनी आसपासच्या सर्व पोलीस स्थानकात बेपत्ता महिलांबद्दलची माहिती घेत या प्रकरणाचा छडा लावला. सीसीटीव्हीच्या आधारे खाडीजवळून जाणाऱ्या शेकडो गाड्यांपैकी एक टेम्पो पोलिसांच्या नजरेस पडला आणि याच्याच आधारे पोलिसांनी आरोपी सलमान आणि त्याचा साथीदार नवाब याला पश्चिम बंगाल येथील मुर्शीदाबाद येथून ताब्यात घेतले.

आरोपींच्या तपासात मृत महिलेचा पती सलमान हा आपली पत्नी हुमेजान उर्फ मुन्नी हिच्या चरित्र्यावर सतत संशय घेत होता, ज्यातून दोघांमध्ये सतत वाद होत होते. अखेर 27 मे रोजी सलमान याने आपला साथीदार नवाब याच्या मदतीने आपल्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि तिचे शव बेडशीटमध्ये गुंडाळून गोणीत भरले आणि सेलोटेपमध्ये गुंडाळून मुंब्रा रेतीबंदर खाडीत टाकला. दोन्ही आरोपींना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात औरंगाबादमध्येही असाच प्रकार

औरंगाबाद शहरात देखील जानेवारी महिन्यात संतापजनक प्रकार समोर आला होता, दुहेरी हत्याकांडाने (Double Murder) औरंगाबाद जिल्हा (Aurangabad District) हादरला होता. चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून  हत्या केली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समीर विष्णु म्हस्के ( रा. भाग्यनगर, बाबा पेट्रोलपंपाचे जवळ, औरंगाबाद ) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून, पत्नीचे आरती समीर मस्के तर मुलीचं निशात समीर मस्के नाव होतं. औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता, यातूनच एक दिवशी त्याने आपल्या पत्निसह मुलाचं जीवन संपवलं.

हेही वाचा:

Tejaswini Reddy Murder Case: वर्षभरापूर्वीच ‘ती’ हैदराबादहून लंडनला शिकायला गेली; रुममेटने केली चाकू भोसकून हत्या

[ad_2]

Related posts