Mahayuti Seat Sharing Issue NCP Ajit Pawar Group Demanding Nashik lok Sabha Seat in replacement Of Satara Election 2024 Maharashtra Politicle Updates in Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahayuti Seat Sharing : मुंबई : साताऱ्यात (Satara News) उद्या (बुधवारी) उदयनराजेंचा (Udayanraje Bhosale) भव्य सत्कार केला जाणार असल्याचे पोस्टर्स लागले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी या पाच जागा मिळणार, अशी माहिती मिळत आहे. म्हणूनच, राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल, तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडे करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच अजुनही महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन धुसफूस सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीला एकूण पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी, अशा पाच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण राष्ट्रवादीनं मात्र वेगळीच मागणी समोर ठेवली आहे. सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल, तर त्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. 

परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. पण ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली असेल अशी माहिती मिळत आहे. नाशिक लोकसभेत भाजपचे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी भाजपची मागणी आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. नाशिक लोकसभेच्या मैदानात राष्ट्रवादीकडून भुजबळ परिवारातील वरिष्ठ सदस्यांना उतरवलं जाऊ शकतं अशीही चर्चा सुरू आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराला संधी मिळण्याची शक्यता देखील आहे. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झाली आहे. नाशिकमध्ये तुमची ताकद नाही, त्यामुळे ती जागा आम्हाला सोडा, अशी भाजप आणि राष्ट्रवादीची मागणी आहे. पण हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना आम्ही नाशिक लोकसभा सोडणार नाही, अशी भूमिका शिंदेंनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 

राष्ट्रवादीची नेमकी मागणी काय? 

नाशिक लोकसभेत भाजपचे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी भाजपची मागणी आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंची मात्र मोठी अडचण झाली आहे. नाशिकमध्ये तुमची ताकद नाही त्यामुळे ती जागा आम्हाला सोडा अशी भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना आम्ही नाशिक लोकसभा सोडणार नाही, अशी शिंदेंची भूमिका आहे.  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts