Madha Lok Sabha Election 2024 campaign In first week of April Mohite Patil begin from Malshiras CM Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis maharashtra politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

माढा, सोलापूर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) यंदा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फोडला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माळशिरस येथून प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला जाणार आहे. याची माहिती खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी दिली आहे. मंगळवारी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadnavis) यांची भेट झाल्यावर त्यांनी ही माहिती दिली आहे. 

माढा मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटणार

माळशिरस (MalShiras) हा धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil Madha) यांचा तालुका असून अजूनही मोहिते पाटील (Mohite Patil Madha) गटाकडून माघार घेण्याची कोणतीही चर्चा दिसत नाहीत. गेल्या चार दिवसापासून त्यांनी सुरु केलेला प्रचार थंडावल्याचे चित्र असले तरी, आजही कार्यकर्ते तुतारी हाती घेण्याबाबत आग्रही आहेत. असे असताना महायुती पश्चिम महाराष्ट्राचा प्रचाराचा नारळ थेट माळशिरस येथून फोडण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी महायुतीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. 

1 एप्रिलला माळशिरसमधून सुरुवात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत हे नीरानरसिंहपूर येथे असून प्रत्येक निवडणुकीपूर्वी ते आपल्या कुलदैवताचे दर्शन घेत असतात. यंदाही माळशिरस येथील प्रचाराचा नारळ फोडल्यावर फडणवीस हे कुलदैवताचे दर्शनाला जाणार आहेत. अजूनही महायुतीमधील अनेक जागांचा तिढा सुटला नसला तरी येत्या दोन दिवसात सर्व उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयन महाराज हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचेही निश्चित  झाल्याची माहिती खासदार रणजित निंबाळकर यांनी दिली आहे. 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचाराचा शुभारंभ

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या बहुतांश जागेवरील निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार , रिपाई नेते रामदास आठवले , सदाभाऊ खोत , महादेव जानकर यांच्यासह सर्वच महायुतीमधील घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत . यापूर्वी मोहिते पाटील यांची नाराजी दूर होईल असा विश्वास भाजपला आहे म्हणूनच हा प्रचाराचा नारळ थेट माळशिरस येथून फोडला जाणार आहे . 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts