BJP Leader Sudhir Mungantiwar filed first nomination form Chandrapur Lok Sabha constituency Election 2024 pratibha dhanorkar maharashtra political Updates in Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sudhir Mungantiwar, Chandrapur Lok Sabha Election 2024 : चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Constituency) महायुती (Mahayuti) आणि भाजपचे (BJP) उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विदर्भातून (Vidarbha) पहिला उमेदवारी अर्ज सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गांधी चौकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीची छोटेखानी विजय संकल्प सभा पार पडली. त्यानंतर रॅलीच्या स्वरूपात सुधीर मुनगंटीवारांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिका कार्यालयावर अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. सभेत बोलताना मुनगंटीवारांनी चंद्रपुरातील जनतेला आवाहन केलं. तसेच, महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या प्रतिभा धानोरकरांनाही जोरदार टोला लगावला आहे. 

महायुती आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार सभेत बोलताना म्हणाले की, “घाई घाईमध्ये मी मंचावर आलोय, जर कोणाचं नाव घ्यायला विसरलो असेल, तर पाय आपटू नका. कारण तुम्ही पाय आपटले, तर निवडणुकीत आपटायची वेळ येईल. मी देवाचा आशीर्वाद घेऊन आलो. मात्र, ज्यांच्या नावांमध्येच देव आहे, ते देवेंद्र फडणवीस आशीर्वाद द्यायला आले असतील, तर जगात कोणीही पराभूत करू शकत नाही. महायुतीचे सर्व घटक आणि कार्यकर्ते कृत्रिमपणे नाही, तर मनापासून कामाला लागले आहेत. म्हणून वाटतं निवडणूक माझी नाही. तर ही बंधूंनो तुमची आहे. म्हणूनच ठरवलं आहे, जिंकलो तर माजायचं नाही, हरलो तर खचायचं नाही.”

कुंभकर्ण म्हणेल काँग्रेसवाले तर माझेही बाप, मी सहा महिने झोपायचो, हे वर्षभर झोपतात : सुधीर मुनगंटीवार 

पत्रकार म्हणतात निवडणुकीत दोन मुद्दे आहेत. त्यापैकी एक आहे जात. जर कोणी जातीच्या नावानं प्रचार करणार असेल, तर तो आपल्या पायावर धोंडा मारून घेणार. या मतदारसंघात सर्व समाजातील लोक आहेत. मी प्रत्येक जातीच्या लोकांची सेवा करणार आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी जोरदार टोला लगावला आहे. तसेच, पुढे बोलताना माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवार सोबत नाही. मी विकासाबद्दल बोलणार, समोरच्या उमेदवार यांनी त्यांचे सरकार असताना किती काम केलं, किती दिवे लावले, हे सांगितलं पाहिजं. सत्तेत असताना किती झोपा काढल्या हे सांगायला पाहिजे. काँग्रेस कुंभकर्णापेक्षा पुढे आहे. कुंभकर्ण म्हणेल काँग्रेसवाले तर माझेही बाप आहेत. मी सहा महिने झोपायचो हे वर्षभर झोपतात. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts