Nilesh Lanke : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर निलेश लंकेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले, ‘राजकारण कधीही…’

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nilesh Lanke : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र महायुतीतून अहमदनगरसाठी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा आहे. यावर निलेश लंके यांनी सूचक वक्तव्य केले आहे. 

निलेश लंके म्हणाले की, मला सकाळपासून तीन-चार जणांचे फोन आले. मात्र मी काही त्या प्रक्रियेत नाही. ज्या माणसाविषयी बातम्या येत आहेत. त्यालाच याबाबत काही माहिती नाही. मला सकाळी काही लोकांचे फोन आले त्यांनी ही गोष्ट मला सांगितली पण असं काहीही नाही. मला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो मी माझ्या मतदारांना विचारात घेऊन घेईल 

राजकारण कधीही कोणत्याही वळणावर जाऊ शकते

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जाणाऱ्या प्रश्न विचारला असता निलेश लंके म्हणाले की,  राजकारण कधीही कोणत्या वळणावर जाऊ शकते, मी अजूनपर्यंत कुठल्याही शेवटच्या निर्णयापर्यंत आलो नाही.  मी सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात जावून  कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. आता निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

…तर अहमदनगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढत

अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपकडून सुजय विखे पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अद्याप महाविकास आघाडीकडून कुठलाही उमेदवार देण्यात आला नाही. निलेश लंके हे अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला आणि महाविकास आघाडीकडून लंकेंना उमेदवारी मिळाल्यास अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी लढत होताना दिसून येईल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अश्रू बघून मतदान कराल तर पाच वर्षे तुमच्याच डोळ्यात पाणी येईल : सुधीर मुनगंटीवार

एकीकडे लोकसभेची धामधूम, दुसरीकडे दुष्काळाची टांगती तलवार; उजनी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर, दररोज कोट्यवधी लिटर पाण्याचं बाष्पीभवन

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts