Maharashtra School Starts In The State From Today Minister Deepak Kesarkar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Deepak Kesarkar : विदर्भ वगळता आजपासून (15 जून) राज्यातील शाळा सुरु होणार आहेत.  या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावं, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व 

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाला गुरुवार दिनांक 15 जून 2023 पासून सुरूवात होत आहे. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतल्याचे मंत्री केसरकर म्हणाले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकवण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

शासन विद्यार्थ्यांच्या सोबत

कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमाची महती समजून घ्यावी.  माणुसकी जपावी असा सल्लाही दीपक केसरकर यांनी दिला. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा आणि महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. जगातील सर्वात तरुण देश म्हणून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा असे केसरकर म्हणाले. या कामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन विद्यार्थ्यांच्या सोबत असून जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हावे, असेही केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले.

दरवर्षी राज्यातील शाळा या 13 जून रोजी सुरु होतात. मात्र, यावर्षी राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी जिली होती. आजपासून राज्यातील शाळा सुरु होणार असल्या तरी विदर्भातील शाळा आजपासून सुरु होणार नाहीत. विदर्भातील शाळा या येत्या 30 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिली. शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. तसेच शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

Heat Wave: ‘सीबीएसईसह केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात घ्या’, वाढत्या तापमानामुळे पालकांची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

[ad_2]

Related posts