ipl 2024 csk vs gt chennai super kings scores 206 runs shivam dube rachin ravindra stormy innings sameer rizwi debuts

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CSK vs GT IPL 2024 Live Score : रचिन रविंद्रची आक्रमक सुरुवात आणि शिवम दुबे (Shivam Dube) याचं झंझावती अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने (CSK) निर्धारित 20 षटकांमध्ये 6 विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. शिवम दुबेने 51 धावांचा पाऊस पाडला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 46 धावा केल्या. अखेरीस समीर रिझवी याने झटपट धावा केल्या. गुजरातकडून राशिद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. गुजरातला चेपॉकवर सामना जिंकण्यासाठी 207 धावांची गरज आहे.  (Chennai Super Kings vs Gujarat Titans)

रचिन रवींद्रचा झंझावत, रहाणे फेल – 

चेपॉक स्टेडियमवर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. पहिल्या विकेटसाठी 32 चेंडूमध्ये 62 धावांची भागिदारी केली.  रचिन रविंद्र यानं गुजरातच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. राशिद खान यानं रवींद्रला बाद करत जोडी फोडली. रचिन रविंद्र यानं 20 चेंडूत 46 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये त्याने तीन षटकार आणि तीन चौकार ठोकले. रचिन रवींद्र बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि ऋतुराजने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अजिंक्य रहाणे बाद झाला. रहाणेला मोठी खेळी करता आली नाही. अजिंक्य रहाणे यानं 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा काढल्या. रहाणे बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी चेन्नईच्या डावाला आकार दिला. 

ऋतुराजची कर्णधाराला साजेशी फलंदाजी – 

रचिन रवींद्र आणि शिवम दुबे एका बाजूला चौकार षटकारांचा पाऊस पाडत होते. त्यावेळी दुसऱ्या बाजूला ऋतुराज गायकवाड यानं संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. ऋतुराज गायकवाड यानं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. ऋतुराज गायकवाड यानं 36 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली. यामध्ये पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. ऋतुराज बाद झाल्यानंतर मिचेल आणि शिवम दुबे यांनी धावसंख्या वाढवली. 

शिवमचं तांडव – 

शिवब दुबे यानं मैदानात उतरल्यानंतर पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यानं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत चेन्नईची धावसंख्या वाढवली. शिवम दुबे याने 23 चेडूमध्ये 51 धावांची झंझावती खेळी केली. चेपॉकच्या मैदानावर शिवम दुबे यानं चौफेर फटकेबाजी केली. दुबेने 221 च्या स्ट्राईक रेटने धावसंख्या वाढवली. दुबेने आपल्या खेळीत पाच षटकार आणि दोन चौकारांचा साज लावला. दुबे बाद झाल्यानंतर समीर रिझवी यानेही आक्रमक खेळी केली. रिझवी याने 6 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी केली. राशिद खानला त्याने दोन खणखणीत षटकार लगावले. 

डॅरेल मिचेल यानं अखेरपर्यंत खेळपट्टीवर थांबत एक बाजू लावून धरली. डॅरेल मिचेल याने 20 चेंडूमध्ये दोन चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. रवींद्र जाडेजाने अखेरच्या तीन चेंडूवर सात धावा काढल्या.

गुजरातची गोलंदाजी कशी राहिली ?

चेन्नईच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. प्रत्येक गोलंदाजांवर चौकार आणि षटकार लगावले. गुजरातच्या प्रत्येक गोलंदाजांनी प्रतिषटक 8 पेक्षा जास्त धावा दिल्या. राशिद खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने दोन विकेट घेतल्या. पण चार षटकात त्याने 49 धावा खर्च केल्या. साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. उमेश यादव आणि ओमरजई यांना एकही विकेट मिळाली नाही. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts