Maharashtra former governor Bhagat Singh Koshyari educational institutions got 15 crore donations from Anant Ambani

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: मविआ सरकारच्या काळातीलमहाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे एक एक कारनामे उघड होत आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या निनावी पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, राज्यपाल असलेल्या कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या शिक्षण संस्थेने अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्याकडून 15 कोटी रुपयांची देणगी घेतली आहे. अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून चौकशीची मागणी केली आहे.

या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, भगतसिंग कोश्यारीसारख्या माणसाने आपल्या पदाचा उपयोग करून उत्तराखंडमधील एका शाळेच्या नावाने भरपूर माया गोळा केली आहे. 100 सुद्धा मुले नाहीत अशा शाळेकरिता कोट्यवधी रुपयांच्या देणग्या गोळा केल्या आहेत. या पैशातून भगतसिंह कोश्यारी यांनी आपला पुतण्या दीपेन्दरसिंग कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमीन खरेदी करून तिथे रिसॉर्ट सुरु केले आहे. अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी 15 कोटी रुपये घेतले आहेत. शेर सिंग कार्की सरस्वती विहार विद्यालय, डिगरा मुवानी, चामू, कनालीछीना, पिथौरागढ उत्तराखंड देवस्थळी येथील संस्थांच्या नावाने भरपूर संपत्ती गोळा केली आहे. 2019 पूर्वी संस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि 2009 ते 2023 या कालावधीत किती देणग्या मिळाल्या या तुलना सहज करता येऊ शकेल. Devbhumi Shiksha Prasar Samiti, Nainital Bank Haldwani Branch, Account No-0561000000000310 अशी माहिती आहे. याशिवाय SBI बँकेतील एका खात्यातही अनेक व्यवहार करण्यात आले आहेत, अशी माहिती या पत्रात नमूद करण्यात आली आहे.

कंगना मला भेटायला आली मग त्यांचा जळफळाट का? माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सवाल

अनिल गलगली यांनी यापूर्वी आरटीआयद्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेने जमा केलेल्या देणग्यांबाबत माहिती मागवली होती. आता या प्रकरणाची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल, अशी मागणी गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे आता याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. 

भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त

भगतसिंह कोश्यारी हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मविआ सरकाराशी उडणाऱ्या खटक्यांमुळे त्यांची राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीतील राज्यपालनियुक्त सदस्यांची शेवटपर्यंत नियुक्ती केली नव्हती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्य सरकारच्या कारभाराबाबत चिंता व्यक्त केली होती. याशिवाय, भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज,  सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते प्रचंड टीकेचे धनी ठरले होते. 

आणखी वाचा

शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो तर डॉ. बाबासाहेबांपासून गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts