ipl 2024 csk vs gt match highlights chennai super kings defeat gujarat titans by 63 runs gill and gaikwad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CSK vs GT, IPL 2024 : चेपॉक स्टेडियमवर चेन्नईने गुजरातचा 63 धावांनी दारुण पराभव केला. चेन्नईने दिलेल्या 207 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने फक्त 143 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईने आयपीएल 2024 मध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. चेन्नईचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झालाय.

कर्णधारानेच हत्यार टाकले, सुरुवात खराब – 

चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. एकाही फलंदाजाने प्रतिकार केला नाही. गुजरातचा अख्खा संघ — धावांवर संपुष्टात आला. 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवातच खराब झाली. कर्णधार शुभमन गिल फक्त आठ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर वृद्धीमान साहाही लगेच बाद झाला. साहा 21 धावा काढून बाद झाला. यामध्ये चार चौकार लगावले. 

गुजरातचे फलंदाज ढेर – 

साई सुदर्शन यानं संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वेगानं धावा काढता आल्या नाहीत. साई सुदर्शन यानं 31 चेंडूमध्ये 37 धावांची संथ खेळी केली. या खेळीमध्ये साई सुदर्शन यानं तीन चौकार लगावले. विजय शंकर यालाही वेगाने धावसंख्या काढता आल्या नाहीत. विजय शंकर याला 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावाच काढता आल्या. विस्फोटक फलंदाज डेविड मिलरही फार काही करु शकला नाही. मिलर 16 चेंडूमध्ये तीन चौकारासह 21 धावा काढून बाद झाला. उमरजाई याने 10 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 11 धावा केल्या. तर राहुल तेवातिया 11 चेंडूमध्ये सहा धावा करु शकला. राशिद खान एका धावेवर बाद झाला. उमेश यादव 10 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईच्या गोलंदाजांसमोर गुजरातचा एकही फलंदाज टिकला नाही. 

गुजरातची फलंदाजी फ्लॉप, फक्त तीन षटकार – 

चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच भेदक मारा केला. चेन्नईने ठरावीक अंतराने गुजरातला धक्के दिले. दुसरीकडे गुजरातच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गुजरातकडून साई सुदर्शन यानं 37 धावांची सर्वाधिक खेळी केली, पण तीही अतिशय संथ होती. त्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. गुजरातकडून फक्त तीन फलंदाजांना षटकार मारता आले. शुभमन गिल, विजय शंकर आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक एक षटकार मारला. 

गोलंदाजी कशी राहिली – 

चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजाने भेदक मारा केला. तुषार देशपांडे, दीपक चाहर आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर डॅरेल मिचेल आणि पथिराणा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. चेन्नईच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना स्थिरावण्यास संधी दिली नाही. ठरावीक अंतराने विकेट घेतल्या. 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts