[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने दोन्ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली खरी; पण दोन्ही वेळा पराभवाच हाती आला. आता २०२३ ते २०२५दरम्यानच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) तयारी भारतीय संघाला आतापासूनच करावी लागणार आहे. त्याची सुरुवात जुलैमधील वेस्ट इंडिज दौऱ्याने होईल. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचाही सामना भारतीय संघाला करायचा आहे. पुढील दोन वर्षांतही भारतीय संघाची ‘अग्नीपरिक्षा’ असणार आहे.भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. येथे भारत-विंडीजदरम्यान दोन कसोटींची मालिका होणार आहे. या कसोटी डॉमिनिका (१२ते १६ जुलै) आणि त्रिनिदाद (२० ते २४ जुलै) येथे होणार आहेत. त्याआधी ‘डब्ल्यूटीसी’ची सुरुवात इंग्लंड-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या ‘ॲशेस’ मालिकेद्वारे होणार आहे. यातील पहिली कसोटी १६ जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ विडींज दौऱ्यानंतर डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. यानंतर पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर बांगलादेशविरुद्धची मालिका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होईल, त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत-न्यूझीलंडदरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. घरच्या मैदानावरील या दोन मालिकानंतर भारतीय संघ बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
भारतात जेमतेम चार महिन्यांवर आलेल्या वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा कार्यक्रमांची घोषणा झालेली नाही; पण इंग्लंडने त्यांच्या देशात २०३१ पर्यंत होणाऱ्या कसोटी मालिकांची ठिकाणे जाहीर केली आहेत. इंग्लंडने २०२५-२०३१ मधील कसोटींची ठिकाणे बुधवारी जाहीर केली. भारताच्या २०२५ मधील इंग्लंडमधील कसोटी लॉर्ड्स, ओव्हल, एजबॅस्टन, हेडिंग्ले आणि ओल्ड ट्रॅफर्डवर खेळणार आहे, तर २०२९ मधील कसोटी लॉर्ड्स, ओव्हल, एजबॅस्टन, ओल्ड ट्रॅफर्ड आणि दी एजेस बाउल येथे होतील. त्यामुळे येत्या दोन वर्षांत चाहत्यांना चांगलीच मेजवानी मिळणार आहे, हे मात्र नक्की.

भारताच्या ‘डब्ल्यूटीसी’मधील मालिका
– दोन कसोटी वि. वेस्ट इंडिज – जुलै २०२३ – विंडीजमध्ये
– दोन कसोटी वि. दक्षिण आफ्रिका – डिसेंबर-जानेवारी – दक्षिण आफ्रिकेत
– पाच कसोटी वि. इंग्लंड – जानेवारी ते फेब्रुवारी २०२४ – भारतात
– दोन कसोटी वि. बांगलादेश – सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ – भारतात
– तीन कसोटी वि. न्यूझीलंड – ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ – भारतात
– पाच कसोटी वि. ऑस्ट्रेलिया – नोव्हेंबर ते जानेवारी २०२५ – ऑस्ट्रेलियात
[ad_2]