Uran and Panvel Farmers oppose giving land to MMRDA for third Mumbai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Third Mumbai MMRDA: तिसऱ्या मुंबईसाठी MMRDA ला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागानं एमएमआरडीएला अटल सागरी सेतूनजिक तिसरी मुंबई वसवण्यासाठी परवानगी दिली आहे. पण राज्य शासनाच्या या निर्णयाला उरण आणि पनवेल तालुक्यातील १२४ गावांमधल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या परिसरात सध्या सिडको प्राधिकरण कार्यरत असल्यानं गावकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची आणि आपली जमीन मालकी स्वत:कडे ठेवायला मिळण्याची खात्री आहे. पण ही गावं एमएमआरडीएच्या अखत्यारीत गेल्यास आपल्या जमिनीच्या मालकीहक्कावर गदा येण्याची गावकऱ्यांना भीती वाटत आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी हजारोच्या संख्येनं हरकती घेऊन,एमएमआरडीएच्या विरोधात लेखी निवेदनं देण्यास सुरुवात केली आहे. कोकण भवन येथील नगरविकास कार्यालयात हरकतींची नोंद करण्यात आली असून, राज्य शासनानं हा निर्णय मागे घ्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

[ad_2]

Related posts