Vasant More will meet prakash ambedkar in rajgruha in Mumbai maharashtra political News( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : काहीच दिवसांपूर्वी मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरे अनेक राजकीय  (Pune Lok Sabha Constituency) नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या प्रमुख्य नेत्यांची भेट घेतली. शरद पवार, संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट रवींद्र धंगेकरांचीदेखील भेट घेतली मात्र आता वसंत मोरे(Vasant More)  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेणार आहे. आज दुपारी राजगृहावर वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहे. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा  निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर भेटीगाठी सुरु आहेत. 

वसंत मोरे यांनी आधी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीमध्ये  पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे नेते  रवींद्र धंगेकर  यांना देण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वसंत मोरे उमेदवारी संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आठ उमेदवार हे जाहीर केले आहेत. त्यांनी पुणे लोकसभेसाठी कोणताही उमेदवार घोषित करण्यात आला नाही आहे. त्यामुळे वसंत मोरे हे प्रकाश आंबोडकरांची भेट घेणार आहेत. 

 

 

अधिक पाहा..

Related posts