mla nilesh lanke may give resignation of his mla post soon join sharad pawar ncp ahead of lok sabha election 2024 maharashtra politics marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठ्या घडामोडी घडत आहेत. आपली राजकीय फायदा लक्षात घेऊन वेगवेगळे नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. यामध्ये निलेश लंके (Nilsesh Lanke) यांचादेखील समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा आमदार निलेश लंके हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान ते जाहीर सभेत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

निलेश लंकेंनी बोलावली बैठक

निलेश लंके यांनी 29 मार्च रोजी  सुपा-अहमदनगरच्या मार्गावर एका बैठकीचे आयोजन केले आहे. लंके यांनी पारनेर-नगर विधानसभआ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक, सभासद आणि हिंतचिंतकांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे लंके या बैठकीत नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार? 

गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशा हालचालींनाही सध्या वेग आला आहे. निलेश लंके यांच्या प्रवेशासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे लंके कोणत्याही क्षणी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या गटात सामील होऊ शकतात. तसे झाल्यास लंके यांना अहमदनगरची उमदेवारी दिली जाऊ शकते. याच कारणामुळे लंके आजच्या या बैठकीत आपल्या आमदारीकच्या राजीनाम्याची घोषणा करू शकतात. त्यामळे या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

अहमदनगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील?

निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास तो अजित पवार यांच्यासाठी चांगलाच धक्का असल्याचे म्हटले जात आहे. कारण अहमदनगर ही जागा भाजपच्या वाट्याला आलेली आहे. येथे भाजपने सुजय विखे पाटील यांना उणेदवारी दिली आहे. असे असताना शरद पवार यांनी निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यास अहमदनगरमध्ये विखे पाटील विरुद्ध लंके अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत लंके काय घोषणा करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा >>

वीस वर्षांपूर्वीचे ‘ते’ प्रकरण उकरून ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं, ‘दाऊदच्या मदती’च्या आरोपांमुळे गोविंदाची कोंडी होणार?

अधिक पाहा..

Related posts