ipl 2024 rohit sharma hardik pandya mumbai indians players photos with mystery girl sejal jaiswal know about her

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2024) पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदाच्या पर्वात विजय मिळवता आलेला नाही. मुंबईला गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या दोन मॅचमधील पराभवानंतर मुंबईची टीम आता होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर पुढील चार मॅच खेळणार आहे. हैदराबादमधील मॅचनंतर  मुंबई इंडियन्सची टीम आता मुंबईत दाखल झाली आहे.  रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंसोबत एका मुलीचे फोटो व्हायरल झाले होते. ती मुलगी कोण होती यासंदर्भातील माहिती आता समोर आली आहे. 

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत दिसणारी मुलगी कोण? 

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत एका मिस्ट्री गर्लचे फोटो व्हायरल झाले होते. मुंबईच्या चाहत्यांपुढं आणि क्रिकेटच्या प्रेक्षकांना या खेळाडूंसोबत असलेली मिस्ट्री गर्ल कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला होता. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत दिसणारी मुलगी सेजल जयस्वाल ( Sejal Jaiswal) ही अभिनेत्री आहे.

सेजल जयस्वाल ही अभिनेत्री असून तिनं दिल मांगे मोअर आणि डेडींग इन डार्क या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तिनं वयाच्या 19 व्या वर्षापासून मॉडेलिंग सुरु केलं होतं. 


मुंबईला पहिलया विजयाची प्रतीक्षा

मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात निराशाजनक ठरली आहे. मंबईला गुजरात टायटन्सच्या विरुद्ध 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर हैदराबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये देखील मुंबईचा 31 धावांनी पराभव झाला होता.

मुंबईला होम ग्राऊंडवर पहिला विजय मिळणार?

यंदाच्या आयपीएलमध्ये एक विशेष ट्रेंड पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ज्या टीमच्या होम ग्राऊंडवर मॅच झालेली आहे, त्या टीमनं विजय मिळवलेला आहे. आता मुंबईची मॅच राजस्थान विरुद्ध मुंबईत 1 एप्रिल रोजी होणार आहे. या मॅचमध्ये तरी मुंबईला विजय मिळतो का हे पाहावं लागणार आहे. 

मुंबईच्या पुढील चार मॅचेस वानखेडेवर

मुंबई इंडियन्सचे पुढील चार सामने वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. 1 एप्रिलला राजस्थान रॉयल्स,  7 एप्रिलला   दिल्ली कॅपिटल्स, 11 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि 14 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धची मॅच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 

मुंबई इंडियन्स सहावं विजेतेपद पटकावणार? 

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाचवेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. गेल्या तीन आयपीएलमध्ये मुंबईला विजेतेपद पटकावतं आलं नव्हतं. आता मुंबईनं कॅप्टन बदलला असून यंदा तरी मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळणार का हे पाहावं लागणार आहे.  

संबंधित बातम्या : 

 Rishabh Pant : कुलदीपनंतर खलील अहमद DRS साठी रिषभकडे आला, म्हणाला ले-ले भाई, पंतचं खोचक प्रत्युत्तर

हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं …

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts