Vasant More meet Prakash Ambedka In Mumbai On Pune loksabha Constutiency candidate maharashtra pOLITICAL nEWS

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : वसंत मोरे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. .या भेटीत नेमकं काय होणार?, वंचितकडून पुणे लोकसभेसाठी वसंत मोरेंना उमेदवारी मिळेल का?, असे अनेक तर्कवितर्क लढवले गेले. ‘प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली आहे. त्यानंतर येत्या 31 तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईल, असं प्रकाश आंबेडकांनी म्हटलं आहे. 

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

तात्यांसोबत चर्चा झाली. दुसरी महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. जे काही अधिकृत सांगायचं आहे, ते 31 तारखेपर्यंत कळवेन. महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि कोण कोण करेल हे अधिकृतपणे ३१ किंवा १ तारखेपर्यंत सांगितलं जाईल. काही चर्चा ओपन करु शकत नाही. कारण सध्या घडामोडी घडत आहेत. राजकीय स्तरावर नाहीत पण सोशल पातळीवर, गावपातळीवर सुरु आहेत. त्या चर्चांना एक रुप येण्यासाठी दोन तीन दिवस जातील. त्यानंतर महाराष्ट्राचं नवं समीकरण समोर येईल. आजची चर्चा त्याअनुषंगाने झाली. ग्रामीण आणि शहरी पातळीवर जे काही घडतंय ते दोन-चार दिवसात समोर येईल. सर्वांची उत्तरं मिळतील. मविआकडून आवाहन केलं जातंय, पण जे काही होतंय त्याबाबत दोन तारखेपर्यंत थांबा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

वसंत मोरे काय म्हणाले? 

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक सकारात्मक झाली. येत्या दोन तीन दिवसात निर्णय होईल, तो निर्णय सर्वांना कळवला जाईल.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts