chandrapur lok sabha election 2024 bjp leader sudhir mungantiwar targets congress leader pratibha dhanorkar maharashtra political marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Election 2024)  काँग्रेसची (Congress)  उमेदवारी मिळवल्यापासून प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगतान दिसत आहे. आशातच आता पुन्हा सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिभा धानोरकरांवर जोरदार हल्लाबोल करत टीकास्त्र डागले आहे. मी कुठेही विधवेच्या अश्रूंचा अनादर केला नाही. मात्र, अश्रू फक्त निवडणुकीच्या कामासाठी आहे का. उद्या प्रत्येक जण म्हणेल माझे अश्रू पहा आणि मतदान करा. तुमच्या मतदारसंघात मी कोट्यवधी रुपयांचे काम केले आहे. असे असताना तुमीच आमच्यावर जर जहरी टीका कराल तर याद राखा, मी वाघच संवर्धन आणि संरक्षण करणारा आहे. वेळ पडली तर पिंजऱ्यातही टाकणार, असे म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी थेट प्रतिभा धानोरकर यांना इशारा दिला आहे. ते यवतमाळ येथे बोलत होते. 

माझे अश्रू पाहा आणि मतदान करा 

काँग्रेस ने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कायम अपमान केलाय. अफजल गुरूला फाशी देऊ नका, अशी मागणी ज्यांनी केली. आतंकवाद्यांच्या बाजून उभे राहण्याची भूमिका ज्यांनी घेतली. त्यांच्याबाबत आपण बोलायचे नाही का, सोबतच 19 महिने ज्या निरपराध लोकांना जेलमध्ये टाकले,  त्यांचे अश्रू बघायचे नाही. असेच जर सुरू राहिले तर उद्याचालून प्रत्येक जण म्हणेल, माझे अश्रू पहा आणि मतदान करा. आई वडिलांची इच्छा नसताना नवरी म्हणून घोड्यावर चढले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे न ऐकता जबरदस्ती तिकीट मागणे आणि न दिल्यास काहीही करू शकतो, असे सांगणाऱ्या उमेदवार किती योग्य आहे हे काँग्रेसच सांगू शकेल, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिभा धानोरकरांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला लगावला आहे.  

तिकीटसाठी मरणाऱ्यांना त्यागाच महत्त्व काय कळणार

मी माझ्या उमेदवारीबाबत कोणकडेही आग्रह अथवा मागणी केली नाही. शिवाय तिकीटासाठी मी कधी म्हणतही नाही. मात्र, उमेदवारी दिलीच तर त्यात विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही. परंतु तिकीटासाठी मरणाऱ्यांना पक्षातील त्यागाचे महत्त्व काय माहिती असणार, असे मुनगंटीवार म्हणाले. माझ्यावरही काँग्रेसच्या उमेदवारांनी टीका केली. पण मी सध्या बोलणार नाही. त्यांना योग्यवेळी योग्य उत्तर देऊ, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts