Pune Loksabha election Vasant More statement On Pune Loksabha constituency candidate maharashtra political news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : वसंत मोरे  (Vasant More) यांनी मागील काही दिवसांत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली  महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा (Pune Lok Sabha Constituency) केल्यानंतर वसंत मोरेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यानंतर आज त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. वसंत मोरेंना इतर कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने तिकिट दिलं नाही त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकांची भेट घेतली आणि पुणे लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं संगितलं. याच पार्श्वभूमीवर आता वसंत मोरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘इतर नेत्यांनी तिकीट दिलं नाही म्हणजे दाद दिली नाही असं होत नाही. या सगळ्याला  मी नकारात्मक घेणार नाही.  मी आहे तोपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही, असं ठाम मत वसंत मोरेंनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं.  ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. चार दिवसांपासून चर्चेसंदर्भात बोलणी सुरु होती. आज पुण्यातील वंचितचे नेते आणि आम्हीदेखील चर्चा केली पुढील एक दोन दिवसात काही फलित बाहेर येईल. 

वसंत मोरे म्हणाले की,  मी पुण्याच टफ फाईट देणार आहे. मी आहे तोपर्यंत पुण्याची लोकसभेची निवडणुक एकेरी होऊ देणार नाही. ही निवडणूक पुणेकरांची निवडणूक आहे.   ही पुण्याची निवडणूक आहे. एका सेनेच्या दोन सेना झाल्या, राष्ट्रवादीतदेखील फूट पडली. या सगळ्या राजकारणाला पुणेकर वैतागले आहेत. 

‘पुण्याच्या निवडणुकीला वेळ आहे. बाकी उमेदवार प्रचाराला लागले आहेत. मी आताच नाही तर दोन तीन वर्ष झाले प्रचार करत आहे.  मी मागील तीन चार वर्षांपासून रस्त्यावर उतरुन काम करत आहे.  एसीमध्ये बसून गाडीत बसत प्रचार होत नाही.उन्हात फिरु द्या, रस्त्यावर उतरु द्या आणि लोकांमध्ये काम करु द्या’, म्हणत त्यांनी पुण्यातील उमेदवारांना टोला लगावला आहे.   

…हे ऐकून राजकारणात आल्याचं फलित झालं!

सुजात आंबेडकरांची भेट झाली. सुजात मला बोलले मला चांगल्या व्यक्तीला मतदान करायला भेटते याचा आनंद आहे, हे ऐकून राजकारणात आल्याचं फलित झालं आहे. मी पहिल्यांदाच त्यांना भेटलो आणि आज ते खास माझ्यासाठी मुंबईत आले आहेत, असंही ते म्हणाले.  

राज ठाकरेंसंदर्भात काही बोलू शकत नाही!

मनसे महायुतीत सहभागी होत आहे. मात्र त्यांच्यासंदर्भात मी काहीही बोलू शकत नाही. 12 मार्चलाच मनसेचा अध्याय माझ्यासाठी संपला आहे. त्यामुळे मी राज ठाकरेंसंदर्भात काही बोलू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts