ipl 2024 kkr vs rcb royal challengers bengaluru captain faf du plesis reaction after defeat against kolkata knight riders

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळुरु : फाफ डु प्लेसिसच्या (Faf du Plesis) नेतृत्त्वात यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) बंगळुरुला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आयपीएलच्या दहाव्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. बंगळुरुचं होम ग्राऊंड असलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरनं त्यांना  7 विकेटनं पराभूत केलं. या पराभवानंतर कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं बातचीत केली. यामध्ये त्यानं केकेआर विरुद्ध पराभव कशामुळं झाला याचं कारण सांगितलं. फाप डु प्लेसिसनं कोणत्याही खेळाडूला या पराभवासाठी जबाबदार धरलं नाही, त्यानं नेमकं कोणत्या गोष्टीला जबाबदार धरलं पाहुयात. 

फाफ डुप्लेसिसनं सांगितलं धोका कुणी दिला? 

मॅच संपल्यानंतर बोलताना फाफ डुप्लेसिसनं खेळपट्टीला पराभवासाठी जबाबदार धरलं. आम्हाला खेळपट्टीनं धोका दिला असं तो म्हणाले. पहिल्या डावात आम्हाला वाटलं की खेळपट्टी दुहेरी वेगाची आहे. तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळी गोलंदाजांनी कटर्स, बॅक ऑफ द लेंध बॉलिंग केली त्यावेळी त्यांना संघर्ष करावा लागला. हे पाहता आम्हाला याचा फायदा होईल असं वाटलं होतं. 182 धावा हा चांगला स्कोअर आहे, असंही वाटलं होतं. आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करातना विराट कोहलीला शॉट मारण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, कारण तिथं वेग कमी होता, दुहेरी वेग होता, असंही फाफ डु प्लेसिस म्हणाला. 

आरसीबीच्या पॉवर प्लेमधील बॉलिंग संदर्भात बोलताना फाफ डु प्लेसिस म्हणाला की तुम्हाला  नेहमी मॅच संपल्यानंतर गोष्टी समजतात. आम्ही काही गोष्टी करणार होतो पण ज्या प्रकारे सुनील नरेन आणि फिलीप सॉल्ट फटकेबाजी करत होते, त्यामुळं आमच्या गोलदांजांवर दबाव आला होता. त्या दोघांनी चांगले फटके मारले आणि आमच्यापासून मॅच हिरावून घेतली. सुनील नरेनच्या विरोधात तुम्ही स्पिन बॉलिंग ट्राय करु शकत नाही, तिथं तुम्हाला वेगवान गोलंदाजी करावी लागते. फिलीप सॉल्टनं या गोष्टी जाणून घेतल्या होत्या. त्यांनी पहिल्या 6 ओव्हरमध्येच मॅच आमच्यापासून दूर नेली होती, असं फाफ डु प्लेसिस म्हणाला.  

मॅक्सवेलला बॉलिंग देऊन प्रयत्न केला, बंगळुरुत फिंगर स्पिनर प्रभावी ठरतो. मात्र, काल  बॉलला स्पिन मिळत नव्हती. डावं उजवं समीकरण चांगलं असतं पण तुम्ही पाहिलं असेल की व्यंकटेश अय्यर चांगली फटकेबाजी करत होता. ग्राऊंड छोटं असल्यानं स्पिनरला देखील फटके मारले जात होते, असं फाफ डु प्लेसिस म्हणाला. खरंतर तुमच्याकडे दोन्ही बाजूनं स्पिन बॉलिंग सुरु ठेवण्याची क्षमता असली पाहिजे. आमच्या टीमकडे तसा पर्याय उपलब्ध नव्हता, असं फाफ  डु प्लेसिस म्हणाला.
   
फाफ डु  प्लेसिसनं यावेळी बोलताना विजयकुमार वैश्य आणि कर्ण शर्माबाबत देखील भाष्य केलं. विजयकुमार वैश्य शानदार गोलंदाजी करतो मात्र त्याला संधी मिळाली नाही. आम्ही पहिल्या डावाचा अंदाज घेत कर्ण शर्माला संधी देण्याबाबत विचार केला. जो बॉलर्स स्लोअर्स टाकू शकेल त्याला आम्ही संधी देण्याचा विचार केलाहोता. रस्सेलनं 80 टक्के स्लोअर टाकले होते, असं फाफ डु प्लेसिसनं म्हटलं. 

संबंधित बातम्या : 

IPL 2024 : आरसीबीच्या स्वप्नांवर पाणी फेरणाऱ्या व्यंकटेश अय्यरचा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात लांब सिक्स,बॉल थेट स्टेडियम बाहेर

केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts