Pune loksabha Constituency anonymous banners seen in pune demand promise from loksabha candidatesmaharsahtra Political News ravindra dhangekar murlidhar mohol vasant more( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुणेकर आणि पुणेकरांच्या पाट्या किती प्रसिद्ध आहेत, हे वेगळं सांगायची  (Maval Loksabha Constituency)गरज नाही. राज्यात घडत असलेल्या घडामोडी असो किंवा एखादी सूचना असो पुणेकर त्यांच्या शब्दांत अनेकांना गार करतात. पुणेरी पाटी म्हटलं की सूचनेसोबत टोमणा हा येतोच. सध्या राज्यात निवडणुकींचे वारे सुरु आहे. त्यात मागील वर्षभरात राज्यात झालेल्या घडामोडी, पक्षफुटींमुळे यंदाची निवडणूक रंजक होणार आहे. याच निवडणुकीला अनुसरुन पुण्यातील एक पुणेरी पाटी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. जागृत पुणेकर’, या नावाने लावण्यात आलेल्या या बॅनर्समध्ये पाच वर्ष पक्ष सोडणार नाही असं आश्वासन देणाऱ्या उमेदवारालाच आपलं मत द्या, असं या पाटीवर लिहिण्यात आलं आहे. या पाटीवरुन पुणेकरांनी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना चांगलाच टोमणा मारला आहे. 

पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मी आहे तोपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होऊ देणार नाही, असं म्हणत वसंत मोरेदेखील कोणत्या पक्षाने उमेदवारी दिली तर त्या पक्षाकडून नाही तर अपक्ष या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. तिन्ही उमेदवार पुण्याचं वेगळं चित्र नागरिकांना दाखवत आहेत. शाश्वत विकास, स्मार्ट सीटी आणि अनेक महत्वाचे प्रश्न घेऊन प्रचाराला लागले आहे. प्रत्येकाच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. मात्र यातच पुणेकरांना फक्त पक्ष न बदलणारा नेता हवा असल्याचं या पुणेरी पाटीच्या माध्यमातून पुणेकरांनी सांगितलं आहे. 

 बॅनरवर नक्की काय लिहिलंय?

‘मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी 5 वर्ष प्रामाणिक राहीन, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तीला निवडून देऊ नका,” जो उमेदवार आपल्या परिचय पत्रात असे लिहिन त्यांनाच मतदान करा, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. शिवाय पुण्यातील अनेक ठिकाणी हे बॅनर्स पाहायला मिळत आहे. हे बॅनर नक्की कोणी लावले, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. 

या बॅनरच्या मताशी सहमत, पुणेकरांची प्रतिक्रिया

 या बॅनरवर पुणेकर आता व्यक्त होत आहेत. सध्या राजकारण गढूळ झालं आहे. कोण कोणत्या पक्षात कधी जाईल याचा काही नेम नाही आहे. त्यामुळे विकासासोबत पक्षनिष्ठा असलेला उमेदवार हवा असल्याच्या भावना पुणेकरांनी व्यक्त केल्या आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Weather Update : उन्हामुळे जीवाची लाहीलाही; रात्री गरमीनं हैराण; पुणं दिवसा चाळीशी पार तर रात्रीच्या तापमानातही वाढ

 

 

अधिक पाहा..

Related posts