baramati loksabha Constituency Vijay shivtare will decide to came back from baramati loksabha election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती, पुणे : राज्यातील काही लोकसभा मतदार संघाच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. बारामती लोकसभा मतदार संघात अनेकांचा नाराजीचा सुर दिसत आहे. या नेत्याची नाराजी दूर करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्यातच विजय शिवतारेंनी बारामतीच्या जागेवर अपक्ष लढण्याचा निर्धार केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी विजय शिवतारेंशी (Vijay Shivtare) मुंबईत बैठक झाली आणि त्यानंतर शिवतारेंचं बंड थंड होणार?, अशा चर्चा आहे. मात्र अजित पवारांना उर्मट म्हणणारे शिवतारे खरच माघार घेणार का? की अजित पवारांविरोधात तगडी लढत देणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर चर्चेनंतर शिवतारेंकडून वेळकाढूपणा केला जात आहे. आज भूमिका घेतो, उद्या भूमिका स्पष्ट करतो, असं म्हणत शिवतारेंनी दोन-तीन दिवस घालवले. आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र त्यानंतर पुण्यात बोलताना त्यांनी मवाळ भूमिका घेतली.  राजकारणात कोणीही कोणाचा कायम स्वरुपी दुष्मन नसतो आणि दोस्तही नसतो. मात्र, लोक हित कशामध्ये आहे. त्याचा नीट विचार करुन जे जे मला आता मुख्यमंत्री महोदयांनी समजावलं. महायुतीच्या बाबतीतील चर्चा जशीच्या तशी कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेईन, असं सांगितलं. 

 जनतेचा अजित पवारांना विरोध पाहून…

 मी जनतेचा आवाज बघून अजितदादांना विरोध केला होता. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सगळ्या नेत्यांशी चर्चा सकारात्मक झाली पण तरीही मला माझ्या कार्यकर्त्यांंशी चर्चा करायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. त्यासाठी  भोर, इंदापूर, दौंड, बारामती या शहरातून कार्यकर्ते येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

पक्षाचा आदेश अंतिम; हर्षवर्धन पाटील, राहुल कुलांची भूमिका

बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा जरी असली तरीही बारामतीच्या जागेचा निर्णय अजून पक्का झाला नाही आहे.  या उमेदवारीवरुन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार राहुल कुल याचीदेखील नाराजी दिसत आहे. मात्र पक्षाचा आदेश अंतिम असेल असं म्हणत दोघांनीही आपली  भूमिक स्पष्ट केली आहे. त्यामुळे अजित पवारांना बारामतीसाठीच फार मेहनत करावी लागत असल्याचं दिसत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune News : ना विकास, ना स्मार्ट सीटी; उमेदवाराकडून पुणेकरांना हवंय ‘हे’ अजब प्रॉमिस, वाचून तुम्ही पण म्हणाल पुणेकरांना मानलं बुवा!

 

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts