Ambadas Danve on BJP Shivsena mahayuti party entry Ambadas Danve clarify miss leading news about leaving shiv sena thackeray maharashtra politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मराठवाड्यातील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडणार अशा चर्चा रंगल्या आहेत. अंबादास दानवे (Ambadas Danve) लोकसभेचं तिकीट (Lok Sabha Election 2024) न मिळाल्याने नाराज असल्याने महायुतीच्या (Mahayuti) वाटेवर असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आल्या होत्या. याबाबत अंबादास दानवे (Ambadas Danve Facebook Live) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या सर्व बातम्या खोट्या असल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावल विरोधकांना लक्ष्य केलं आहे. 

महायुतीत जाणाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

अंबादास दानवे यांनी यावेळी म्हटलं की, ज्या चॅनेलवाल्यांनी बातमी चालवली. त्यांनी ही बातमी खोटी बातमी दिली. मी खोट्या बातम्या दिल्या त्यांच्यावर मानहानी दावा करणार आहे. मी 30 वर्ष जुना शिवसैनिक आहे. ज्यांनी खोट्या बातम्या चालवल्या त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार, लीगल ऍकशन घेतली जाईल. मी शिवसेनेचा आहे. मला गट प्रमुख पदपासून विरोधी पक्ष नेता झालोय, त्यामुळे निवडणूक येतात जातात पण मी जाणार नाही. चॅनेलच्या टीआरपीसाठी काहीही चालवू नका. 

माझ्या नाराजीचा फायदा घेतला

मी नाराजी व्यक्त केली, त्याचा फायदा चॅनेल घेतला आहे. मी 30 वर्ष शिवसेनेचं काम करतोय, त्यामुळे या बातम्यात तथ्य नाही. आमच्या शिवसेनेनेचा स्वतंत्र विचार आणि बाणा आहे. मी अगोदरच  लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार केलाय आणि करणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts