sharad pawar NCP MLA Rohit Pawar Statement On sunetra pawar candidate survay took From ajit pawar Group bamarati loksabha constituency

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राज्यात महायुतीकडून जागावाटपाचा तिढा सुटायचं नाव घेत नाही आहे. त्यात बारामती लोकसभा मतदार (Baramati Loksabha Constituency) संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार असल्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) नावाची अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार गटावर आणि महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. बारामतीत केलेल्या सर्व्हे सुनेत्रा पवार मागे असल्याचं दिसत आहे. ⁠त्यामुळे ते आता दहावा सर्व्हे करतील आणि मग उमेदवार जाहीर करतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यासोबतच सुप्रिया सुळे यांचे लीड अडीच लाखांच्यावर असेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 

रोहित पवार काय म्हणाले?

बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा रखडली आहे. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, बारामती मतदार संघाचे नऊ सर्व्हे अजित पवार गटाकडून झाले आहेत. त्यात त्यांचे उमेदवार सर्व सर्व्हेमध्ये मागे असल्याचे दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळेच त्यांच्या सर्व्हेमध्ये पुढे दिसत आहे. ⁠त्यामुळे ते आता दहावा सर्व्हे करतील आणि त्यानंतर बारामतीचा उमेदवार जाहीर करतील.बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते हे केवळ जनतेला खुश करण्यासाठी नाराज ते अजित पवारांचा प्रचार करणार नाहीत.सुप्रिया सुळे यांचे लीड अडीच लाखांच्यावर असेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 

 शिवतारेंची माघार ठिके पण व्हिडीओंचं काय?

 विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यांनतर त्यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर ते निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, विजय शिवतारे यांनी आधी अजित पवारांवर टीका केली होती आणि आता ते यू टर्न घेत आहेत.  नेत्यांना भेटक्यावर भूमिका बदलणार असाल तर हे लोकांना  हे आवडणार नाही. तुम्ही अजित पवारांच्या विरोधात बोललेले व्हिडिओ लोकांपर्यंत गेले आहेत ते आता डिलीट कसं करणार?, खोचक टोला त्यांनी शिवतारेंना लगावला आहे. 

केंद्राचे आदेश पवार-शिंदेंना मान्यच करावे लागणार!

राज्यातील महायुतीच्या उमेदवारांचे जागावाटप रखडलं आहे. हे जागावाटप अजित पवारांमुळे रखडल्य़ाच्या चर्चा आहेत. त्यावर रोहित पवारांनी म्हटलं की, जागावाटपासंदर्भात केंद्रातून आदेश आले तर ते एकावेच लागतात. दिल्लीवरून भाजपचे जे आदेश येतील ते अजित दादांना मान्य करावे लागतील आणि एकनाथ शिंदे यांना देखील मान्य करावे लागतील. 

इतर महत्वाची बातमी-

याचना नहीं अब रण होंगा… अंबादास दानवे ठाकरे गट सोडण्याची चर्चा, उद्धव ठाकरेंचा फोटो शेअर करत फेसबुकवर पोस्ट

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts