hardik pandya mumbai indians captian take break from ipl spent time with family

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hardik Pandya IPL 2024 Break मुंबई: मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटनं संघाचा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेत नेतृ्त्त्वाची धुरा रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याकडे दिली आहे. मात्र, हार्दिक पांड्याला यंदाचं आयपीएल चांगलं गेलेलं नाही. एकीकडे क्रिकेट फॅन्सकडून होणारी टीका आणि दुसरीकडे मुंबई इंडियन्सचे दोन जिव्हारी लागणारे पराभव या स्थितीचा सामना  हार्दिक पांड्यानं केला आहे. या दरम्यान हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हार्दिक पांड्यानं हैदराबाद विरुद्धच्या मॅचनंतर ब्रेक घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईची पुढील मॅच 1 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. या दरम्यानच्या काळात हार्दिक पांड्या त्याच्या घरी पोहोचला असून त्यानं काही वेळ कुटुंबीयांसोबत घालवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 

हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झाला तेव्हापासून त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं. रोहित शर्माचे चाहते हार्दिक पांड्यावर टीका करताना दिसून आले आहेत. याशिवाय गुजरात टायटन्सच्या समर्थक प्रेक्षकांनी देखील अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्या विरोधात नारेबाजी केली होती. या दरम्यानच्या काळात हार्दिक पांड्यानं त्यांच्या कुटुंबीयासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतल्याची माहिती आहे.   

मुंबई इंडियन्सची यापूर्वीची मॅच 27 मार्चला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झाली होती. त्या मॅचमध्ये मुंबईला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता मुंबई इंडियन्सचे पुढील चार सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. सोमवारी 1 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी मॅच होणार आहे. पाचवेळा आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावणारी मुंबई यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयासाठी   संघर्ष करत आहे. राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या विरुद्ध मुंबई इंडियन्स  भिडणार आहे. हे सर्व सामने मुंबईत होणा आहेत. 

दरम्यान,वन क्रिकेटच्या रिपोर्टनुसार सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरोधातील मॅच नंतर मुंबईची टीम दिल्लीत परतल्यानंतर हार्दिक पांड्या लगेचच त्याच्या मुंबईतील घरी निघून गेला.  हार्दिक पांड्या पुन्हा आराम करुन राजस्थान विरुद्धच्या मॅचसाठी तयार होईल. त्यानं टीमसोबत राहण्याऐवजी कुटुंबीयांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. 

मुंबईचा सलग दोन मॅचमध्ये पराभव 

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध 24 मार्चला गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या लढतीत मुंबईचा पराभव 6 धावांनी पराभव झाला होता. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईचा पराभव 31 धावांनी झाला आहे. 

संबंधित बातम्या :

Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता मैदानात, ट्रोलर्सला म्हणाला कॅप्टन असो की 15 वा खेळाडू ते…

KKR vs RCB : कोलकाताकडून जिव्हारी लागणारा पराभव, आरसीबीच्या कॅप्टननं सांगितलं नेमका धोका कुणी दिला?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts