Dindori Loksabha : अखेर शरद पवारांनी डाव टाकलाच, दिंडोरीत भारती पवारांविरोधात भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bharti Pawar vs Bhaskar Bhagare : आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी (Dindori Lok Sabha Constituency) भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

भाजपकडून दिंडोरीसाठी विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. भारती पवारांविरुद्ध तोडीस तोड उमेदवार शोधण्याचे शरद पवार गटाकडे मोठे आव्हान होते. कालच नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत दिंडोरीसाठी गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र शरद पवार पक्षाकडून पक्षाचे एकनिष्ठ भास्कर भगरे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता दिंडोरी लोकसभेवर भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार (Bhaskar Bhagare vs Bharti pawar) लढत होणार हे निश्चित झाले आहे. 

कोण आहेत भास्कर भगरे? 

राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून भास्कर भगरे हे पक्षात आहेत. राष्ट्रवादी शाखाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2005 साली गोंडेगाव (नाशिक) सरपंचपदी त्यांची निवड झाली होती. 2007 साली खेडगाव गणातून दिंडोरी पंचायत समितीवर सदस्य व सभापती म्हणून निवड झाली होती. 2012 -17 या कालावधीत मडकीजांब गणातून ते पंचायत समिती सदस्य राहिले आहेत. 2017 साली खेडगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहेत. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2014 पासून दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. निफाड तालुका माध्यमिक शिक्षक को. सोसायटीमध्ये ते 20 वर्षांपासून संचालक आणि चेअरमन आहेत. 

शरद पवार गटाची पहिली यादी

वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्कर भगरे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरुर – डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके

इतर महत्वाच्या बातम्या 

Nilesh Lanke vs Sujay Vikhe Patil : काल राजीनामा, आज शरद पवार गटाकडून उमेदवारी, अहमदनगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढत होणार

Amravati Loksabha: मोठी बातमी: आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात; नवनीत राणांना कडवी टक्कर?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts