ramtek lok sabha constituency kishore gajbhiye determined to contest elections as an independent candidature for lok sabha election 2024 maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ramtek Lok Sabha Constituency : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर नेते किशोर गजभिये (Kishore Gajbhiye) हे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका (Lok Sabha Election) या पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघातून होत असून या पार्श्वभूमीवर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मात्र किशोर गजभिये यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे न घेतल्याने आता रामटेक मतदारसंघाच्या अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात शिवसेनेचे राजू पारवे, काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे, तर वंचितचे शंकर चहांदे यांच्यासह अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांच्यात लढत होणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. 

किशोर गजभिये आपल्या भूमिकेवर ठाम!

महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) कळीचा मुद्दा ठरलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील (Ramtek Lok Sabha Constituency) बंडखोरीचा वाद शमण्यात ठाकरे गटाला यश आले असले तरी काँग्रेसचे बंडखोर नेते किशोर गजभिये हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आज दुपारी तीन वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येत होता. मात्र किशोर गजभिये यांनी काँग्रेसपक्षातच बंडखोरी करत आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिणामी याचा फटका काँग्रेस पक्षाला बसणार असल्याचे बोलले जात आहे. 

कुणाला फटका बसतो याच्याशी माझा संबंध नाही

याविषयी बोलताना किशोर गजभिये म्हणाले की, रामटेक लोकसभा मतदारसंघातून मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता. हा अर्ज वैध ठरला असून मला निवडणूक चिन्ह देखील प्राप्त झाले आहे. यामध्ये मला प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. मी माझ्या निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे त्याचा फटका कुणाला बसतो याच्याशी माझा काहीही संबंध नाही. त्याची मी चिंता देखील करत नसल्याचे किशोर गजभिये म्हणाले. सध्या घडीला मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला नाही. मात्र, लवकरच मी तो देखील देणार आहे. मला उमेदवारी मागे घेण्याबाबत अनेकांचे फोन आले आणि माझ्यावर दबाव देखील टाकण्यात आला. मात्र सध्या घडीला मी त्यावर फार भाष्य करणार नसल्याचे देखील गजभिये म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts