शिर्डीत मविआची डोकेदुखी वाढणार? बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीय महिला नेत्या प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shirdi Loksabha : महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा सुटली. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरेंना (Bhausaheb Wakchaure) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडेंना (Sadashiv Lokhande) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे यांची लढत होणार हे निश्चित झाले आहे. मात्र भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार नाराज झाल्या आहेत. 
  
शिर्डी येथील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उत्कर्षा रुपवत या काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. मात्र  शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटाने वाकचौरेंना उमेदवारी दिल्याने रूपवते नाराज आहेत. 

उत्कर्षा रुपवते बंडखोरी करणार? 

उत्कर्षा रुपवते या वंचितच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. उत्कर्षा रूपवते बंडखोरी करणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. उत्कर्षा रुपवते या राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उत्कर्षा रुपवते निकटवर्तीय मानल्या जातात. वंचितच्या तिकिटावर त्या उभ्या राहिल्यास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. शिर्डी मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची समाजाची मागणी आहे. आता उत्कर्षा रुपवते काय निर्णय घेतात? या पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अशी झाली होती 2014 ची निवडणूक 

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे यांची लढत झाली होती. त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये लोखंडे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर होऊनही खासदार होण्याचा मान मिळवत तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. आता भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. शिवाय गेल्या 10 वर्षात विद्यमान खासदार कोणतेही काम करू शकले नसून जनता माझ्या पाठीशी असल्याचा दावा भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे. तर गद्दार कोण हे जनता ठरवेल, असा इशारा वाकचौरेंनी लोखंडेंना दिला आहे. शिवसेनेनंतर काँग्रेस त्यानंतर पुन्हा भाजप आणि अपक्ष असा प्रवास करत मशाल हाथी घेतलेल्या उमेदवाराने गद्दार कोण हे सांगू नये, असा टोला लोखंडे यांनी वाकचौरे यांना लगावला आहे. त्यामुळे शिर्डीची लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.  

आणखी वाचा 

नाशिकच्या जागेवर नवा ट्विस्ट! गोडसे-भुजबळांच्या रस्सीखेचीत उमेदवारी तिसराच पटकावणार? भाजपचे संकटमोचक शांतीगिरी महाराजांची भेट घेणार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts