Madhya Pradesh Assembly Election 2023 Times Now Navbharat Survey Opinion Polls On MP Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली :  मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (Madhya Pradesh Election 2023) आता दोन-तीन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेआधी होणारी ही निवडणूक सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेससाठी (Congress) महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत असणार आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. भाजपने आपल्या निवडणूक रणनीतीमध्ये बदल केला आहे. तर, काँग्रेसमध्ये आत्मविश्वास असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान, टाइम्स नाऊ-नवभारतने एक सर्वेक्षण (Opinion Poll) केले आहे. 

सर्वेक्षणानुसार, दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत दिसून येणार आहे. 20 सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दोन महिन्यांच्या आकडेवारीच्या आधारे हा सर्वे अहवाल तयार करण्यात आला आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रोष असल्याचे चित्र आहे. काँग्रेस सत्ता स्थापन करणार असली तरी त्यांना झगडावे लागणार असल्याचे सर्वेतील कल सांगत आहे. 

कोणत्या पक्षाला किती जागा?

राज्यात आता विधानसभा निवडणुका झाल्या तर भाजपला 102 ते 110 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर काँग्रेसला 118 ते 128 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, 2023 च्या निवडणुकीत भाजपला 42.8 टक्के मते मिळू शकतात. त्याचवेळी काँग्रेसला 43.8 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 13.40 टक्के मते मिळू शकतात.

भाजपकडून दिग्गज उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिग्गजांना मैदानात उतरवले आहे. राज्यात तीन केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाही. यापूर्वीही अनेक सर्वेक्षण अहवालांमध्ये भाजपविरोधात नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या, त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. 

मध्य प्रदेशच्या निवडणुकीत सात खासदारांना ज्यात तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश त्या सगळ्यांना विधानसभेसाठीचं तिकीट देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नरेश तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते यांना भाजपनं विधानसभेत लढायला सांगितलंय. सोबत भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनाही बऱ्याच वर्षानंतर निवडणुकीत उतरायला सांगितलंय. 

मध्य प्रदेशात निवडणुका जाहीर होण्याआधी भाजपनं आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्यात. या आआधी 17 ऑगस्टला पहिली यादी जाहीर झाली होती. त्यात 39 आणि सोमवारच्या यादीतही 39 जणांची नावं जाहीर झाली. निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजपने पहिल्यांदाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

सर्वेक्षणावर भाजप-काँग्रेसने काय म्हटले?

निवडणूकपूर्व चाचणी अंदाजावर बोलताना भाजपने म्हटले की, 20 सप्टेंबरपर्यंतचा हा सर्वे आहे. पक्षाने आपल्या निवडणुकीत रणनीतीमध्ये 20 सप्टेंबरनंतर बदल केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येईल, असा दावा भाजपने केला आहे. तर, काँग्रेसच्या नेत्यांनी मध्य प्रदेशमध्ये 140 जागांवर विजय मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.  

[ad_2]

Related posts