Dehradun Suicide News 6-day-old Baby Lies Near Parents Bodies For 3 Days Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dehradun Suicide: देहरादूनमधील (Dehradun) क्लेमेंट टाऊन भागातून एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. येथील एका घरामध्ये मृत दाम्पत्याच्या मृतदेहाजवळ एक चार ते पाच वर्षांच बाळ सापडलं. हे बाळ जिवंत असून सध्या उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण देहरादूनमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाळाच्या आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. पोलिसांना जेव्हा याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थ गाठलं, त्यावेळी पोलिसांना या दाम्पत्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. 

नेमकं काय घडलं?

माहितीनुसार, काशिफ या मृत झालेल्या व्यक्तीने एका वर्षांपूर्वी अनम हिच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. काशिफला त्याच्या पहिल्या पत्नीपासून पाच वर्षांचा मुलगा आहे. काशिफची पहिली पत्नी ही सतत त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, काशिफ तिला कोणताही प्रतिसाद देत नव्हता. तेव्हा त्याची पहिली पत्नी पोलिसांना घेऊन त्याच्या घरी पोहोचली. घरामध्ये पोलिसांना काशिफ आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, दाराबाहेर असताना पोलिसांना लहान मुलाच्या रडण्याचा देखील आवाज येत होता. पोलिसांना बाळाच्या आई-वडिलांचा मृतदेह हा सडलेल्या अवस्थेमध्ये सापडला. तसेच पोलिसांना त्यांच्या मृतदेहाजवळ हे लहान बाळ देखील सापडले. 

…म्हणून आत्महत्या केल्याचा संशय 

दरम्यान, पोलिसांनी त्या लहान बाळाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या रुग्णालयात या बाळावर उपचार सुरु असून त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणालाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाच्या शरीराला देखील किडे लागण्यास सुरुवात झाली होती. मृतांविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘काशिफच्या घरी अनेक वाद सुरु होते. तसेच त्याच्यावर कर्ज देखील होते.’ त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणास आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे. 

पोलिसांनी काय म्हटलं?

यासंबंधी माहिती देताना पोलिस अधिकारी पंकज गैरोल यांनी म्हटलं की,’ हे दाम्पत्य सहारनपुरमधील राहणारे होते. त्यांचा क्रेनचा व्यवसाय होता. तसेच प्राथमिक तपासामध्ये काशिफचे दुसरे लग्न झाल्याचं समोर आलं आहे. तसेच काशिफचे त्याच्या नातेवाईकांसोबत अने वाद होते. त्याच्यावर कर्जाचा देखील भार होता. ज्या अवस्थेमध्ये या दाम्पत्याचे मृतदेह सापडले त्यामुळे ही आत्महत्या असल्याचं निदर्शनास येत आहे.’ 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

30 मिनिटांच्या आगीमुळे 90 मिनिटं कोलकाता विमानतळाची वाहतूक ठप्प; सुदैवानं जीवितहानी टळली

[ad_2]

Related posts