lucknow super giants beats punjab kings by 21 runs earns first victory of ipl 2024 lsg vs pbks mayank yadav krunal pandya shines shikhar dhawan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

LSG vs PBKS, IPL 2024 : शिखर धवनच्या पंजाब संघाने हातात आलेला सामना 21 धावांनी गमावला आहे. इकाना स्टेडियमवर लखनौनं प्रथम फलंदाजी करताना 200 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने शानदार सुरुवात केली, पण अखेरच्या 10 षटकांमध्ये पंजाबच्या फलंदाजांनी हाराकिरी करत सामना गमावला. लखनौकडून निकोलस पूरन 42, कृणाल पांड्या 43 आणि क्विंटन डी कॉकचे अर्धशतकाच्या बळावर 199 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तर दाखल पंजाबने शानदार सुरुवात केली. पहिल्या 10 षटकांमध्ये पंजाबने 98 धावा चोपल्या होत्या. पण अखेरच्या 10 षटकांमध्ये लखनौने कमबॅक केले. युवा मयंक यादवच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी ढेपाळली. पंजाबला 178 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबचा हा दुसरा पराभव होय. तर लखनौचा पहिला विजय आहे. 

शिखर धवन आणि जॉनी बेयरस्टो यांनी शानदार सुरुवात केली होती.  पंजाब 11 षटकानंतर बिनबाद 101 धावा, अशा सुस्थितीमध्ये होता. पण आयपीएल पदार्पण करणाऱ्या मयंक यादव याच्या गोलंदाजीपुढे पंजाबची फलंदाजी ढेपाळली. मयंक यादव याने जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन आणि जितेश शर्मा यांना एकापाठोपाठ एक तंबूत पाठवले. मयंक यादवने पदार्पणाच्या सामन्यात यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकला. लखनौच्या विजयाचा शिल्पकार मयंक यादव ठरला. 

 पंजाबची शानदार सुरुवात – 

पंजाब किंग्सचा कर्णधार कप्तान शिखर धवन आणि जॉनी बेयरस्टो यांनी शानदार आणि स्फोटक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 102 धावांची भागिदारीही झाली होती. पण 12 व्या षटकात जॉनी बेयरस्टो तंबूत परतला. त्यानंतर पंजाबची फलंदाजी ढेपाळली, एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. जॉनी बेयरस्टो याने 29 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी केली. यामध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. जॉनी बेयरस्टोनंतर प्रभसिमरन आणि जितेश शर्मा तंबूत परतले. एका बाजूला धवन उभा ठाकला होता, पण दुसऱ्या बाजूला एकापाठोपाठ एक विकेट पडत होत्या. सॅम करन यालाही मोठी खेळी करता आल्या नाहीत. शिखर धवन याने 50 चेंडूमध्ये सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. पण धवनच्या अर्धशतकापेक्षा मयंक यादव याचा मारा भेदक ठरला. 

मयंक यादव आणि मोहसिन खान यांना सामना पलटवला

11 व्या षटकापर्यंत सामन्यावर पंजाबचे वर्चस्व होते. पंजाबने बिनबाद 101 धावा केल्या होत्या. पंजाबकडे 10 विकेट शिल्लक होत्या, पण मयंक यादव याचा स्पेल सुरु झाला अन् सामना बदलला. मयंकने आपला पहिलाच चेंडू 155 किमी प्रतितास वेगाने टाकला. मयंकच्या वेगापुढे जॉनी बेयरस्टो फसला अन् बाद झाला.   प्रभसिमरनही वेगाने धावा काढायला लागला, पण मयंकने आपल्या दुसऱ्याच षटकात त्यालाही बाद केले. प्रभसिमन सात चेंडूत 19 धावा काढून बाद झाला. या खेळीत त्याने एक चौकार आणि दोन षटकार लगावले. 

मयंक यादव याने याने आपल्या तिसऱ्या षटकात जितेश शर्मा याचा अडथळा दूर केला. मयंक यादव याने 4 षटकांमध्ये 27 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूचा दाखवला. अखेरच्या 30 चेंडूमध्ये 64 धावांची गरज होती, मयंकचा स्पेल संपला होता. पण उरलेले काम मोहसीन शेख यानं पूर्ण केले. मोहसीन याने आधी शिखर धवनवा बाद केले. धवन याने 70 धावांची खेळी केली. त्यांतर पुढच्याच चेंडूवर सॅम करन याचाही अडथळा दूर केला. एकापाठोपाठ एक पंजाबचे फलंदाज तंबूत परतले. 19 वे षटक संपल्यानंतर लखनौचा विजय निश्चित झाला. कारण, पंजाबला विजयासाठी 6 चेंडूमध्ये 40 धावांची गरज होती. अखेरच्या षटकात लिव्हिंगस्टोन याने आक्रमक रुप घेतलं, पण तोपर्यंत वेळ गेली. लखनौने 2024 मधील पहिल्या विजयाची नोंद केली. पंजाबचा 21 धावांनी पराभव केला. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts