IPL 2024 Latest Points Table: After Lucknow’s win against Punjab today, the IPL 2024 points table has changed.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 Latest Points Table: लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना 30 मार्च रोजी अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला गेला. लखनौने प्रथम खेळताना 199 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्स चांगली सुरुवात झाली, मात्र डावाच्या शेवटच्या 10 षटकांत सातत्याने विकेट पडल्यामुळे पंजाबचा सामना 21 धावांनी गमवावा लागला.

धावांचा पाठलाग करताना 11 षटकांनंतर पंजाबने एकही विकेट न गमावता 101 धावा केल्या होत्या, मात्र लखनौचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने अचूक गोलंदाजी केली. मयंकने जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्माला बाद करत माघारी पाठवले. लखनौच्या विजयात मयंकने महत्त्वाची भूमिका बजावली.

पंजाब किंग्सकडून शिखर धवनने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 50 चेंडूंचा सामना करत 70 धावा केल्या. मात्र, धवनची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. जॉनी बेअरस्टोनेही 42 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने नाबाद 28 धावा केल्या. सॅम कुरन आणि अर्शदीप सिंग यांनी संघासाठी गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. कुरनने 3 बळी घेतले. तर अर्शदीपने 2 बळी घेतले.

लखनौने आज पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत बदल झाले आहेत. लखनौ आजच्या विजयासह पाचव्या स्थानावर पोहचला आहे. तर पंजाब किंग्स सहाव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत अजूनही चेन्नईचा संघ अव्वल स्थानी आहे. तर केकेआर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि केकेआरने दोन सामने जिंकले असून दोन्ही संघाचे 4 गुण आहेत. चेन्नईचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे तो अव्वल स्थानी आहे. राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर असून राजस्थानचेही एकूण 4 गुण आहेत. हैदराबादचा संघ 2 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

लखनौचा संघ 2 गुणांसह पाचव्या क्रमांकावर, पंजाब 2 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. तसेच तीन सामन्यात एक विजय मिळवून आरसीबीचा संघ सातव्या स्थानावर आहे. तर गुजरातचा संघ देखील 2 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. दिल्ली नवव्या स्थानावर आणि मुंबई इंडियन्स दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबईचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. मात्र या दोनही सामन्यात दिल्ली आणि मुंबईचा पराभव झालेला आहे. त्यामुळे गुणतालिकेत ते सगळ्यात तळाला विराजमान आहेत.

संबंधित बातम्या:

…तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!

आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts