Shirur Loksabha Amol Kolhe took the blessings of mla Dilip Mohite wife at the wedding ceremony

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shirur Loksabha : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवार प्रचाराची कोणतीच संधी सोडत नाहीत. याची प्रचिती शिरूर लोकसभा निवडणुकीत आली. शिरुर लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (30 मार्च) लग्नसोहळ्यास हजेरी लावली. हा लग्नसोहळा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीचा होता. नेमकी हीच वेळ शोधत कोल्हे यांनी प्रचाराची एक फेरी घेतली. 

कोल्हेंकडून मिसेस मोहितेंच्या पाया पडले 

यावेळी कोल्हे यांनी नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद देतानाच प्रचाराची एक फेरीही घेतली. यावेळी कोल्हे यांनी दिलीप मोहिते यांच्या पत्नीचे चरणस्पर्श केले. तुम्ही मला आशीर्वाद दिला की मी तो अप्रत्यक्षपणे आमदार दिलीप मोहितेंनी मला खासदारकीसाठी आशीर्वाद दिला असं समजतो. असं कोल्हेनी सूचित केलं अन् उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अमोल कोल्हे यांची लढत अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटलांशी आहे.

आढळराव पाटील आणि दिलीप मोहिते पाटलांमध्ये अजूनही दुरावा 

दरम्यान, शिरुर लोकसभेला शिवसेना शिंदे गटातून अजित पवार गटात प्रवेश केलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार दिलीप मोहिते आता जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप दोघांमध्ये म्हणावे तसे सूत जुळलेले नाहीत. याची प्रचिती शिवाजी आढळरावांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावेळी आली होती. मी जुळवून घेतोय पण, गैरविश्वास दाखवला तर माझं नाव लक्षात ठेवा, असा इशाराच दिलीप मोहिते यांनी थेट अजित पवारांसमोर असा इशारा आढळरावांना दिला होता. त्यामुळे मोहिते शिरूर लोकसभेत आढळराव की कोल्हे? कोणाचा प्रचार करतील, अशी चर्चा मतदारसंघात रंगलेली आहे. अशावेळी कोल्हेनी आमदार मोहितेंचा खासदारकीसाठी अप्रत्यक्षपणे आशीर्वाद घेणं, बरंच काही सांगून जातं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts