vba president prakash ambedkar allegations on maha vikas aghadi shiv sena congress and ncp comment on rahul gandhi mumbai rally

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर भाष्य केलं. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांत आपापसात एकमत झालं नाही. आम्ही हेच सांगत होतो. आता मात्र ते स्पष्ट झालं आहे. तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत. महाविकास आघडीत ज्या मतदारसंघात मतभेद होते, ते मतभेद अजूनही कायम आहेत. याच कारणामुळे मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा चालू आहे. म्हणूनच अगोदर तुमचे भांडण मिटवा असं आम्ही त्यांना सांगत होतो. मुळात त्यांचे भांडण मिटत नसताना ते वंचितला दोष देत होते. त्यांच्यातील भांडण न मिटल्यामुळे आम्ही त्यांच्यात पडत नव्हतो. आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यापैकी कोल्हापूर आणि नागपूर या दोन जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. आणखी पाच जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

…म्हणून ते आम्हाला दोन-तीन जागा देऊ असे सांगत होते

आज एकाच विचाराची माणसं, पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. 14 ते 15 मतदारसंघांत अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी कॅटॅलिस्ट म्हणून भूमिका बजावू शकते, असे आम्ही त्यांना सांगत होतो. पण दुर्दैवाने दोन गोष्टींची अडचण आहे, असं आम्ही मानतो. प्रस्थापित आणि विस्तापित यांचा समन्वय करून आपण ही निवडणूक लढवुया, असं आम्ही सांगत होतो. मात्र याला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा याला नकार होता. त्यामुळेच ते आम्हाला दोन आणि तीन जागा देऊ असे सांगत होते, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.  

आम्ही अनेक जागांवर निवडणूक लढवणार 

प्रस्थापित नेत्यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेना सर्व पक्ष ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तिथे वंचितांसाठी जागा नाही. आम्ही जाहीर करतो की महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार आहोत. इलेक्ट्रोल बाँड हा विषय निवडणुकीत महत्त्वाचा राहील. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय मुद्द्यांसह इतर मुद्यांना सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक लढवणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts