Chandrashekhar Bawankule response to Uddhav Thackeray s criticism of Fadnavis Bawankule says 100 crore recovery files script ready BJP marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : 100 कोटी वसुली फाईल्सची स्क्रिप्ट तयार आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे यांनी ट्वीटरवर पोस्ट करत म्हटलं की, देवेंद्र फडणवीसांनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर 100 कोटी वसुली फाईल्सची स्क्रिप्ट तयार आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांवरील टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

100 कोटी वसुली फाईल्सची स्क्रिप्ट तयार

‘ठगो का मेला’ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे दिल्लीत गेल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंकडून ‘वाझे की लादेन फाईल्स’, ‘खिचडी फाईल्स’, ‘कोविड बॅग फाईल्स’ चाही उल्लेख बावनकुळेंनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचा टोमणेसम्राट उल्लेख करत बावनकुळेंनी खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूरला जावं.

चंद्रशेखर बावनकुळेंची ट्विटर पोस्ट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स मीडियावरून प्रत्युत्तर देत पोस्टमध्ये लिहीलं आहे, मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला’ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला. देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘100 कोटी वसुली फाईल्स’ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये. याशिवाय ‘वाझे की लादेन फाईल्स’, ‘खिचडी फाईल्स’, ‘कोविड बॅग फाईल्स’ असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा.बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही.

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हटलं होतं की, फडणवीसांच्या राहण्याचा आणि जाण्या-येण्याचा खर्च मी करतो, त्यांनी एकदा मणिपूरला जावं. सगळे ठग भाजपमध्ये गेले, त्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो आहोत. भाजपची केविलवाणी धडपड सुरु आहे. खरे ठग कोण आहेत, हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यामुळे सर्वांसमोर आलेलं आहे. ठगांचा मेळा त्यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले सर्व मुख्य ठग त्यांच्याकडे (महायुतीकडे) गेल्यामुळे पक्ष (मविआ) आता मोकळा झाला अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल ठग होते, हे मी किंवा उद्धव ठाकरे यांनी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी सगळे ठग घेतल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..Related posts