kedar jadhav meeting with BJP Devendra Fadnavis likly join bjp marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kedar Jadhav BJP Devendra Fadnavis : भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यानं नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. केदार जाधव (Kedar Jadhav) याची ही भेट खासगी कामानिमित्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, पण केदार जाधव लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केदार जाधव यानं देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्यावेळी आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.  केदार जाधव मूळचा पुणे येथील आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो पुणे संघाचं नेतृत्व करतो. केदार जाधव यानं पुण्यात देवेंद्र फडणवीस याची भेट घेतल्याचं समजतेय. केदार जाधव याच्यासोबत इतर भाजप नेतेही त्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. 

दरम्यान, याआधीही केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली होती. पण आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. त्यातच आता केदार जाधव यानं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. केदार जाधव याचा लवकरच भाजपात प्रवेश होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 



 
केदार जाधवचं क्रिकेट करियर – 

केदार जाधव यानं भारतासाठी 73 वनडे सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केले आहे. केदार जाधव यानं 52 डावात 1389 धावा केल्या आहेत.  केदार जाधव यानं वनडेमध्ये दोन शतकं आणि सहा अर्धशतके ठोकली आहे. केदार जाधव यानं 2015 ते 17 या दरम्यान 9 आंतराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. यामधील सहा डावात 122 धावा चोपल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 58 इतकी आहे. तर आयपीएलमध्ये केदार जाधव यानं 95 सामने खेळले आहेत. त्यामधील 81 डावात त्याने 1208 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 69 इतकी राहिली आहे. केदार जाधव याने आयपीएलमध्ये चार अर्धशतके ठोकली आहेत. 

केदार जाधव याने 42 वनडे सामन्यात गोलंदाजीही केली. त्यामध्ये त्याने 27 विकेट घेतल्या आहेत. 23 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. आयपीएल आणि टी 20 मध्ये केदार जाधव यानं गोलंदाजी केली नाही. 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts