IPL 2024 Latest Points Table: Chennai Super Kings have slipped to the second position in the points table. Kolkata Knight Riders has jumped to the first position.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 Latest Points Table: चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 31 मार्च रोजी सामना झाला. दिल्लीने प्रथम खेळताना 191 धावा केल्या होत्या, पण चेन्नईला 20 षटकांत केवळ 171 धावा करता आल्या आणि 20 धावांनी सामना गमवावा लागला. 

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकांनी दिल्लीला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले आणि बाकीचे काम दिल्लीच्या गोलंदाजांनी केले. विशेषत: मुकेश कुमार आणि खलील अहमद यांनी चेन्नईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. दिल्लीकडून परभाव झाल्यामुळे चेन्नईला मोठे नुकसान झाले आहे. दिल्लीच्या विजयानंतर आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहे.

चेन्नईची घसरण-

आजचा सामना गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नई आणि केकेआरचे 4 गुण आहेत. मात्र नेट रनरेट्या जोरावर केकेआरने गुणतालिकेत मुसंडी मारली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला आणि 2 महत्त्वाचे गुण जमा केले. दिल्ली आता नवव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचली आहे.

गुणतालिकेत इतर संघ कुठे आहेत?

चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवामुळे, कोलकाता नाईट रायडर्स आता अव्वल स्थानी आला आहे. केकेआरचे सध्या 4 गुण आहेत आणि नेट रनरेट +1.047 आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थानचे देखील 4 गुण आहेत. मात्र नेट रनरेट केकेआर पेक्षा कमी असल्यामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.  31 मार्च रोजी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव करून गुजरात टायटन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे आणि त्यांचे आता 4 गुण झाले आहेत. 

हैदराबादचे सध्या 2 गुण आहेत आणि गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर त्यांचा संघ पाचव्या स्थानावर घसरला आहे. लखनौ सुपर जायंट्सचे देखील 2 गुण आहेत, जे सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, 2 सामन्यांत 2 पराभव पत्करून मुंबई इंडियन्सला अद्याप खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या:

मयंक यादवच्या गोलंदाजीवर प्रशिक्षक खूश; पाकिस्तानच्या संघालाही याआधी दिली आहे ट्रेनिंग

…तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!

आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos

अधिक पाहा..[ad_2]

Related posts