Weather Update Today IMD forecast unseasonal Rain alert in maharashtra vidarbh marathwada madhya maharashtra rain prediction marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील हवामानात बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. देशात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता (Unseasonal Rain) आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आज पाऊस (Rain Alert) पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. रविवारीही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे.

आज राज्यासह देशात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात अचानक पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील 24 तासातही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात या भागात पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कुठे ऊन, कुठे पाऊस

राज्यासह देशात एकीकडे पावसाची रिपरिम सुरु असताना दुसरीकडे काही भागात तापमानात वाढ झाली आहे. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तेलंगणामध्ये 1 आणि 2 एप्रिलला वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 1 ते 4 एप्रिल दरम्यान रायलसीमामधील विविध ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 2 ते 4 एप्रिल या कालावधीत मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तर कर्नाटकात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

काही भागात अतिवृष्टीची शक्यता

पुढील 24 तासात आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पाऊसासह काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

या भागात बर्फवृष्टीचा अंदाज

जम्मू-काश्मीर-लडाखमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तेलंगणातील वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 1 एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts