[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Delhi Capitals vs Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 31 मार्च रोजी सामना झाला. दिल्लीने प्रथम खेळताना 191 धावा केल्या होत्या, पण चेन्नईला 20 षटकांत केवळ 171 धावा करता आल्या आणि 20 धावांनी सामना गमवावा लागला.
चेन्नईचा पराभव जरी झाला, मात्र चाहते एमएस धोनीची (MS Dhoni) खेळी पाहून खूप आनंदी आहेत. धोनीने फलंदाजीसाठी येताच पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. धोनीने 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावांची नाबाद खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
Vintage Dhoni 👌#TATAIPL fans were treated to some strong hitting by MS Dhoni
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#DCvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/eF4JsOwmsa
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने हा सामना जिंकला जरी असला तरी या सामन्यात धोनीची क्रेझ पाहायला मिळाली. चेन्नईचा सामना पाहण्यासाठी आयशा खान (Ayesha Khan cheering for MS Dhoni) देखील उपस्थित होती. चेन्नईच्या शिवम दुबेची विकेटनंतर धोनी मैदानावर येताच जोरदार जल्लोष झाला. या जल्लोषात आयशा खान देखील सहभागी झाली होती. धोनी मैदानावर येताच आयशा देखील धोनी-धोनी अशी ओरडताना दिसली. आयशा खानच्या या जल्लोषाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
Ayesha Khan cheering for MS Dhoni. pic.twitter.com/3dwAjGwaw9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 31, 2024
कोण आहे आयशा खान?
आयशा खान अभिनेत्री, मॉडेल आणि इन्फ्युएन्सर आहे. आयशा खानने बिग बॉस सीझन 17 मधून आपली ओळख निर्माण केली. टेलिव्हिजन शो ‘कसौटी जिंदगी के’ मध्ये ज्युनियर कलाकार म्हणून आयशाने पदार्पण केले. तसेच बालवीर रिटर्न्स या शोद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि तेलुगूमध्ये मुखचित्रम या कायदेशीर नाटकाद्वारे चित्रपटात पदार्पण केले होते.
चेन्नईचा पराभव-
आयपीएल 2024 च्या 13व्या क्रमांकाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 191/5 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने संघाकडून सर्वात मोठी 52 धावांची खेळी खेळली. याशिवाय कर्णधार ऋषभ पंतने 51 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकांत 6 बाद 171 धावांपर्यंतच मजल मारता आली. रहाणेने संघासाठी 45 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय आठव्या क्रमांकावर उतरलेल्या धोनीने चाहत्यांची मने जिंकली.
संबंधित बातम्या:
IPL 2024 Latest Points Table: दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नईचं मोठं नुकसान; अव्वल स्थान गमावलं, कोणी पटकावलं?, पाहा Latest Points Table
…तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos
अधिक पाहा..
[ad_2]