चिखलीकरांच्या प्रचारासाठी आलेल्या अशोक चव्हाणांना मराठा समाजाचा विरोध

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Protestors Aggressive : माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मराठा आंदोलकांच्या (Maratha Protestors)  रोषाचा सामना करावा लागला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे (Nanded Lok Sabha Constituency) भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांच्या प्रचारासाठी गावात आलेल्या अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला. तसेच चव्हाण यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. आंदोलकांचा रोष पाहता अशोकचव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांची गाडी अडवणाऱ्या तरुणांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याचे पाहायला मिळाले. 

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना प्रचंड विरोध केल्याचे पाहायला मिळाले. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगान ते या गावात मतदारांच्या भेटी-गाठीसाठी आले होते. मात्र, यावेळी ‘एक मराठा-लाख मराठा’सह विविध घोषणा देत मराठा समाजातील तरुणांनी संताप व्यक्त केला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. शेकडो जणांचा रोषपाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts