मुंबईकरांसाठी खुषखबर! मोनोची प्रवासी क्षमता वाढणार( प्रगत भारत । pragatbharat.com)

मोनोची प्रवासी क्षमता आता वाढण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने दहा मोनो ट्रेन खरेदी करत असून त्यापैकी दोन गाड्या मुंबईत नुकत्याच दाखल झाल्या आहेत. त्यामुळं मोनोच्या प्रवासी क्षमतेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

एमएमआरडीएने तोट्यात असलेल्या मोनो रेलला नफ्यात आणण्यासाठी आणखी दहा गाड्या खरेदी केल्या आहेत. सध्या चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर 10 गाड्या असून 15 मिनिटाला एक याप्रमाणे 142 फेऱ्या चालवल्या जात आहेत. प्रवाशांना मोनोसाठी 15 मिनिटे ताटकळत राहावे लागते. प्रवाशांचा हा वेळ कमी करण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी प्रत्येकी चार डब्यांच्या दहा गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यापैकी दोन गाड्या मोनोच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांसह सुरक्षा अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात केल्या जातील.
शिवाय, नवीन डबे प्रति ट्रेन अंदाजे 568 प्रवाशांच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा किमान 10% अधिक प्रवासी सामावून घेतील.

मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारतीय फर्मची निवड करण्यात आली आहे हे लक्षात घेता, देखभालीसाठी सुटे भाग सोर्स करणे अधिक सुलभ असेल, ज्यामुळे प्रणालीच्या चांगल्या देखभालीसाठी हातभार लागेल.

सध्या मोनोरेल 15 मिनिटांच्या वारंवारतेने 142 सेवा चालवते. मोनोच्या ताफ्यात दाखल झालेल्या दोन गाड्यांची क्षमता दहा टक्के अधिक आहे. सध्या धावत असलेल्या गाड्यांच्या तुलनेत नव्याने खरेदी केलेल्या गाड्यांची प्रवासी क्षमता दहा टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळं चार डब्यांच्या एका मोनो ट्रेनने जास्तीत जास्त 624 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

सध्या धावत असलेल्या मोनोच्या एका गाडीत 568 प्रवासी प्रवास करु शकतात. मात्र नवीन गाड्यांमुळं हीच प्रवासी संख्या 56ने वाढली आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार असून मोनोच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. 

मेट्रोला कनेक्ट करणार 

मोनोला पुन्हा नफ्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आता मोनोची संख्या वाढवण्यात आल्यानंतर आणखी एक प्लान एमएमआरडीएने केला आहे. मोनोला रेल्वे स्थानक आणि नव्याने तयार होणाऱ्या मेट्रो लाइनला कनेक्ट करण्यात येण्याची योजना आखण्यात येत आहे. 

 


हेही वाचा

मुंबई-नाशिक, शिर्डी, पुणे मार्गांवरील शेअर टॅक्सीच्या भाड्यात वाढ


प्लॅटफॉर्म गर्दीमुक्त होणार, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

Related posts