MNS Mahayuti Alliance BJP Raj Thackeray Maharashtra Politics Marathi news ABP Majha Exclusive( प्रगत भारत । pragatbharat.com)

MNS Mahayuti Alliance : महायुतीत समावेशाबाबत मनसेशी चर्चा थंडावल्या, एबीपी माझाच्या हाती एक्स्क्लुझिव्ह माहिती 
मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी दिल्ली ते मुंबई सुरू असलेल्या चर्चा आता थंडावल्या आहेत. मनसेने भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही प्रस्ताव फेटाळल्याची एक्स्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आहे. मनसेने लोकसभा निवडणूक महायुतीतल्या एखाद्या पक्षाच्या चिन्हावर लढावी हा प्रस्ताव मनसेने अमान्य केलाय. तसंच मनसेने लोकसभा जागा न लढवता त्यांना राज्यसभा आणि विधानपरिषदेत जागा दिल्या जातील हा प्रस्तावही मनसेने फेटाळल्याची माहिती आहे. महायुतीत सहभागाबाबत राज ठाकरेंनी दिल्लीवारीही केली, तिथे त्यांची अमित शाहांशी भेटही झाली. त्यानंतर राज्यात मनसेला भाजप सेनेने सोबत घेण्यासंदर्भात सर्व बाबींची चर्चा झाल्या. यासंदर्भात प्राथमिक पातळीवर भाजप शिवसेना मनसे नेत्यांपासून वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली . मात्र वाटाघाटी संदर्भात सविस्तर चर्चा करत असताना एकमेकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने  युतीची बोलणी थांबल्याचे चित्र सध्या आहे

Related posts