irfan pathan names t20 world cup 2024 backs mohsin khan here know latest sports news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ICC T20 World Cup 2024:  आयसीसी विश्वचषक काही महिन्यावर येऊन ठेपला आहे. पुढील काही दिवसांमध्ये बीसीसीआयकडूव विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड केली जाऊ शकते. त्याआधी भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यांन विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या चमूची निवड केली आहे. इरफान पठाण यानं विराट कोहलीला आपल्या ताफ्यात ठेवले आहे. त्याशिवाय मोहसिन खान यालाही संधी दिली आहे. विशेष म्हणजे, इरफान पठाणच्या संघामध्ये अर्शदीप सिंह याला स्थान मिळाले नाही.  

टी20 वर्ल्ड कप संघात केएल राहुलला स्थान नाही?

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यानं टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या 15 जणांमध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह यासारख्या विस्फोटक फलंदाजांना इरफान पठाण यांनं संघात स्थान दिले आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांना स्थान दिलेय. इरफान पठाण यानं विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत, केएल राहुल आणि जितेश शर्मा यामधील दोन जणांची निवड करावी असं सांगितलेय. इरफानच्या मते, ऋषभ पंत आणि जितेश शर्मा या स्पर्धेत आघाडीवर आहेत. त्यामुळे केएल राहुल याला टी 20 विश्वचषकात स्थान मिळणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

इरफान पठाणने कोणत्या गोलंदाजाला दिलं संघात स्थान 

इरफान पठाण यानं 15 सदस्यी संघामध्ये फिरीकपटू म्हणून कुलदीप यादव आणि रवि बिश्नोई यांची निवड केली आहे. त्याशिवाय गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना स्थान दिलेय. अर्शदीप सिंह आणि मोहसिन खान यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा सल्लाही दिला आहे. दरम्यान, अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीला टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची लवकरच निवड करावी लागणार आहे.  1 मे 2024 आयसीसीने अखेरची तारीख दिली आहे. 25 मे पर्यंत संघात बदल केला जाऊ शकतो. 

टी 20 विश्वचषकासाठी इरफान पठानने निवडला भारतीय संघ – 

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत, जितेश शर्मा/केएल राहुल, मोहसिन खान/अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि रवि विश्नोई 

अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात घोषणा केली जाऊ शकते. कारण, टी 20 विश्वचषकासाठी संघ निवडण्याची अखेरची तारीख आयसीसीने एक मे 2024 इतकी ठेवली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस टीम इंडियाची निवड केली जाऊ शकते. 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts